Optical Illusions: या फोटोत लपला आहे एक पाणघोडा, पण भलेभले शोधून थकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 09:48 IST2023-02-18T09:43:49+5:302023-02-18T09:48:07+5:30
Optical Illusions : तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला हिप्पो म्हणजे पाणघोडा शोधायचा आहे. हा प्राणी पाण्यात राहतो म्हणून त्याला पाणघोडा म्हटलं जातं.

Optical Illusions: या फोटोत लपला आहे एक पाणघोडा, पण भलेभले शोधून थकले!
Spot The Hippo In This Photo: ऑप्टिकल इल्यूजन एक असा खेळ आहे जो सगळ्यांनाच खेळावासा वाटतो. पण हा खेळ खेळण्यासाठी किंवा ऑप्टिकल इल्यूजनमधील रहस्य उलगडण्यासाठी डोक्याची गरज असते. तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला हिप्पो म्हणजे पाणघोडा शोधायचा आहे. हा प्राणी पाण्यात राहतो म्हणून त्याला पाणघोडा म्हटलं जातं.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून लोक तो शेअर करत एकमेकांना चॅलेंज देत आहेत. या फोटोत तुम्हालाही मुलं खेळताना दिसत आहेत आणि एक मुलगी रस्त्याने श्वानाला घेऊन जात आहे. तर एक मुलगी सायकल चालवत आहे. यातील रहस्य तुम्हाला 10 सेकंदात शोधायचं आहे.
यात श्वान हा प्राणीच फक्त स्पष्टपणे दिसून येतो. पण यात आणखी एक प्राणी लपला आहे. ज्याबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. तुम्हाला यात हिप्पो म्हणजे पाणघोडा शोधायचा आहे. पण त्याला शोधणं काही सोपं काम नाही. तसे तर ऑप्टिकल इल्यूजन सगळेच भारी असतात, पण त्यातील प्रश्नाचं उत्तर किंवा त्यातील रहस्य आपण किती वेळात उलगडतो हे जास्त महत्वाचं आहे.
जर तुम्हाला अजूनही यातील हिप्पो दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. यात फोटोत जी मुलगी सायकर चालवत आहे तिच्या डोक्यावर बघा. तिच्या केसांमध्ये हिप्पो दाखवण्यात आला आहे.