Optical illusions : या फोटोमध्ये लपलीये एक चिमणी; तीक्ष्ण नजर असेल तर 10 सेकंदात शोधून दाखवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 20:56 IST2023-01-16T20:56:20+5:302023-01-16T20:56:42+5:30
Optical illusions : आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

Optical illusions : या फोटोमध्ये लपलीये एक चिमणी; तीक्ष्ण नजर असेल तर 10 सेकंदात शोधून दाखवा...
Optical illusions: आजकाल इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजन(Optical illusions) फोटोज खूप ट्रेंडमध्ये आहेत. या फोटोंमुळे मेंदूचा चांगलाच व्यायाम होतो. वाचकही आनंदाने अशाप्रकारची कोडी सोडवतात. याद्वारे तुम्ही तुमच्या मेंदूची IQ पातळी तपासू शकता. सध्या अशाच प्रकारचा एक ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये लाकडांचा ढीग दिसत आहे. या लाकडाच्या ढीगात तुम्हाला एक पक्षी शोधायचा आहे. पण, यात अट अशी आहे की, तुम्हाला हा पक्षी अवघ्या 10 सेकंदात शोधायचा आहे. तुमची नजर अतिशय तीक्ष्ण असेल, तरच तुम्हाला दहा सेकंदात पक्षी दिसेल. केवळ एक टक्का लोकच हे ऑप्टिकल इल्युजन सोडवू शकले आहेत. तुम्हीही त्यांच्यापैकी एक होऊ शकता.
पक्षी कुठे लपला आहे?
खूप प्रयत्न करुनही तुम्हाला हा पक्षी दिसत नसेल, तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला पक्षी कुठे आहे, हे सांगू. या फोटोत उजव्या बाजूला मधल्या रांगेत एक पक्षी दिसेल. या लाकडाच्या ढिगात अतिशय हुशारीने हा पक्षी लपून बसला आहे. पक्ष्याचा रंगही लाकडाच्या रंगासारखाच आहे.