Optical Illusion: आता लढवा शक्कल! फोटोमध्ये लपलेल्या दरोडेखोराला शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:23 IST2022-10-03T16:22:11+5:302022-10-03T16:23:02+5:30
सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट फोटो व्हायरल होत असतात.

Optical Illusion: आता लढवा शक्कल! फोटोमध्ये लपलेल्या दरोडेखोराला शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम
नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट फोटो व्हायरल होत असतात. यातीलच काही फोटो ऑप्टिकल इल्युजनचे असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे किंवा डोळ्यांची फसवणूक करणे होय. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लपलेल्या दरोडेखोराला शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. या फोटोमध्ये अनेक प्रकारचे चेहरे पाहायला मिळत आहेत. मात्र त्यामध्ये एक सर्वांपेक्षा वेगळा चेहरा आहे त्याला शोधताना भल्याभल्यांना घाम फुटत आहे.
डोळ्यांची परीक्षा घेणाऱ्या या फोटोमधून एका दरोडेखोराला शोधायचे आहे. हे काम अगदी सोपे आहे, पण तो दरोडेखोर बाकीच्यांसारखा दिसत नाही, तो लुटारू आहे, पण तो कुठे आहे? यावरून सर्वचजण गोंधळून गेले आहेत. कोणाची नजर किती तेज आहे ही क्षमता तपासण्यासाठी काही कोडी तयार केली आहेत. खरं तर या फोटोमधील दरोडेखोराला फक्त 5 सेकंदात शोधायचे आहे.
कुठे आहे दरोडेखोर?
दरम्यान, हा फोटो टेडियाडोने शेअर केला आहे, ज्यामध्ये कलाकारांची काही चित्रे साकारण्यात आली आहेत. ते वेगवेगळ्या क्रिया करताना पाहायला मिळत आहे. कोणी बॉल्ससोबत खेळत आहे तर कोणी सायकल चालवत आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे फुगे देखील धरले आहेत. या फोटोत कुत्रे आणि ढग देखील आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्यामध्ये एक दरोडेखोर लपला आहे, जो माईम कलाकारांसारखा दिसतो पण सहसा तो कोणाच्याच निदर्शनास येत नाही. त्याला शोधण्यासाठी फक्त 5 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.
अनेकांना या दरोडेखोराला शोधण्यात अपयश आले तर काही जणांनी शक्कल लढवून दरोडेखोराला शोधून दाखवले. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की दरोडेखोराने तोंडावर मास्क लावला आहे. मात्र अद्यापही तुम्ही त्याला ओळखले नसेल तर ढगाजवळ पिवळा फुगा धरलेल्या माईम कलाकाराला पाहून तुम्हाला कळले असेल. त्याने डाकूचा मुखवटा घालून कोणाला तरी लुटण्याची सर्व तयारी केली आहे.