वाळलेल्या पानांमध्ये लपला आहे एक जीव, शोधून शोधून थकले लोक; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:12 IST2024-03-13T14:11:38+5:302024-03-13T14:12:06+5:30
Optical Illusion : केवळ सरडाच नाही तर असेही काही जीव आहेत जे लपून राहण्यास हुशार असतात. असाच एक जीव या फोटोत आहे, ज्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी.

वाळलेल्या पानांमध्ये लपला आहे एक जीव, शोधून शोधून थकले लोक; तुम्हीही ट्राय करा!
Optical Illusion : जगातील सगळ्याच जीवांमध्ये जिवंत राहण्यासाठी आली रक्षा करण्यासाठी काही खास गुण असतात. ज्याद्वारे ते या जगात आपलं अस्तित्व कायम ठेवतात. एखादा जीव वेगाने धावू शकतो, एखाद्या जीवामध्ये विष असतं, तर काही जीवांमध्ये लपून राहण्याची अलौकिक क्षमता असते. केवळ सरडाच नाही तर असेही काही जीव आहेत जे लपून राहण्यास हुशार असतात. असाच एक जीव या फोटोत आहे, ज्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी.
एक्सवर @gunsnrosesgirl3 यूजरने ही अवाक् करणारी पोस्ट शेअर केली आहे. एक पोस्ट पोस्ट करण्यात आला असून त्यात वाळलेल्या पानांचा ढिग दिसत आहे. ज्यामध्ये एक जीव लपला आहे. पण तो सहजपणे तुम्हाला दिसणार नाही. फार बारकाईने बघितलं तरच तुम्हाला तो दिसेल.
What do you see camouflaged here? pic.twitter.com/YFSZLDLDHK
— Science girl (@gunsnrosesgirl3) March 12, 2024
जर तुम्हाला या फोटोत अजूनही जीव दिसला नसेल तर तुम्ही खालच्या फोटोत त्याला बघू शकता. तो एक साप आहे. जो पानांमध्ये लपून बसला आहे. काही कमेंट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, हा एक कॉपरहेड साप आहे. कॉपरहेड साप विषारी असतात. इतर विषारी जीवांच्या तुलनेत याचं विष फार घातक असतं.
या फोटोला 79 लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लोकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी सापाला सर्कल करून फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याला तुम्ही बघू शकता.