या फोटो शोधायची आहे फक्त एक चूक, 5 सेकंदाचं चॅलेंज पूर्ण करण्यात अनेकजण फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 09:47 IST2023-05-29T09:43:42+5:302023-05-29T09:47:40+5:30

Quiz Game : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणलाय. ज्यातील एक चूक तुम्हाला 5 सेकंदात शोधायची आहे.

Optical Illusion quiz game : Can you spot the mistake in this picture | या फोटो शोधायची आहे फक्त एक चूक, 5 सेकंदाचं चॅलेंज पूर्ण करण्यात अनेकजण फेल!

या फोटो शोधायची आहे फक्त एक चूक, 5 सेकंदाचं चॅलेंज पूर्ण करण्यात अनेकजण फेल!

Quiz Game :  सोशल मीडियावर वेगवेगळे गेम्स खेळायला मिळतात ज्याने लोकांचा मूड फ्रेश होता आणि त्यासोबतच त्यांच्या बुद्धीलाही चालना मिळते. ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो तर लोकांसाठी फारच आकर्षक ठरतात. यांमध्ये एकतर काही लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात नाही तर काही प्रश्न दडलेला असतो. तर काही फोटोंमध्ये चुका शोधायच्या असतात. या चुका तुम्हाला एका ठरलेल्या वेळेत शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणलाय. ज्यातील एक चूक तुम्हाला 5 सेकंदात शोधायची आहे.

या फोटोत एक मुलगा सोफ्यावर पुस्तक घेऊन बसला आहे आणि समोर टीव्ही न्यूज चॅनल सुरू आहे. त्यासोबतच दोन मांजरीही दिसत आहेत आणि टीव्हीखाली कॅबिनेटवर एक लॅम्प ठेवला व एक प्लांटही ठेवला आहे. एक प्लांट जमिनीवरही ठेवला आहे. सोफ्यासमोर एक टेबल आहे ज्यावर एक कॉफी मग ठेवला आहे. या फोटोत तुम्हाला एक चूक शोधायची आहे.

ही आहे चूक

या फोटोतील चूक ही मुलासमोर असलेल्या टेबलमध्ये आहे. बारकाईने बघाल तर दिसेल की, कॉफी टेबलचा एक पाय गायब आहे. ही एक छोटी चूक आहे पण सहजपणे दिसत नाही.

Web Title: Optical Illusion quiz game : Can you spot the mistake in this picture