या फोटोत लपला आहे एक कावळा, तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:23 IST2023-04-22T16:19:49+5:302023-04-22T16:23:01+5:30
Optical Illusion : तुमच्या समोर हा एक बेटाचा फोटो आहे. या फोटोत तुम्ही खूप सारी झाडं बघू शकता. झाडांची लाकडंही खाली पडलेली दिसत आहेत. थोडं समोर गेलं तर तिकडे पाणीही दिसतं.

या फोटोत लपला आहे एक कावळा, तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला कन्फ्यूज करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघायला मिळतात. या फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला अनेकदा क्वीज आणि गेम्स खेळायला मिळतात. या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. असाच फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक कावळा शोधायचा आहे.
तुमच्या समोर हा एक बेटाचा फोटो आहे. या फोटोत तुम्ही खूप सारी झाडं बघू शकता. झाडांची लाकडंही खाली पडलेली दिसत आहेत. थोडं समोर गेलं तर तिकडे पाणीही दिसतं. अशात या बेटावर एक कावळा आहे. हा कावळा तुम्हाला 15 सेकंदात शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटोने लोकांचं मनोरंजन तर होतंच सोबतच आयक्यू आणि डोळ्यांचीही टेस्ट होते. यावरून तुमची दृष्टी कशी आहे हेही दिसून येतं. सोबतच तुमच्या मेंदुची चाचणीही होते.
कावळा तसा तर तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला शोधणं इतकंही सोपं नाही. पण इतक्या चलाखीने लपवण्यात आलं आहे की, तो सहजपणे शोधता येणार नाही. त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण आणि डोकं शांत असायला हवं. जर अजूनही तुम्हाला यातील कावळ दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. फोटोच्या डाव्या बाजूला एक लाकूड पडलं आहे. त्यावर तुम्हाला कावळा बसलेला दिसेल.