Optical Illusion: स्मार्ट लोकच शोधू शकतात या फोटोतील घुबड, पाहा तुम्हाला दिसतंय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 14:02 IST2022-05-01T14:01:31+5:302022-05-01T14:02:15+5:30
Find Owl in Picture optical illution: हा फोटो एका जंगलाचा आहे. यामध्ये अनेक झाडंही दिसत आहेत. यामध्ये एक घुबड लपलेलं आहे. परंतु ते कुठे लपलंय हे भल्याभल्यांनाही शोधला आलेलं नाही. पाहा तुम्हाला सापडतंय का.

Optical Illusion: स्मार्ट लोकच शोधू शकतात या फोटोतील घुबड, पाहा तुम्हाला दिसतंय का?
Find Owl in Picture optical illution: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले अनेक फोटो व्हायरल होत आहेत. अनेकदा असे फोटो पाहून गोंधळही उडतो. या चित्रांमधील लपलेलं कोडं जाणून घेणं इतकं सोपं नाही. भल्या भल्या लोकांना त्यातील गुढ उकलणं अशक्य होतं.
सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो एका जंगलाचा आहे. यामध्ये अनेक झाडंही दिसत आहेत. तसंच यात एक घुबडही लपलं आहे. परंतु ते शोधण्यात भल्या भल्यांनाही यश मिळत नाहीये. अनेक लोक या फोटोत लपलेलं घुबड शोधण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांना त्यात यश मिळालेलं नाही. तर काही जणांना सहजरित्या त्या फोटोत असलेलं घुबड दिसलं आहे.
या फोटोत जंगलातील एका झाडावर घुबड लपलेलं आहे. हा फोटो सारखा सारखा पाहूनही ते शोधणं शक्य होत नाही. जर तुम्हाला ते दिसत नसेल तर तो फोटो अगदी लक्षपूर्वक पाहा. या फोटोत तुम्हाला दोन पाढऱ्या रंगाची झाडं दिसतील. त्यावर तुम्ही फोकस करून पाहा. त्यावर तुम्हाला एक घुबड बसलेलं दिसेल. यानंतर तुम्हाला सहजरित्या ते घुबड दिसेल. जर तरीही सापडलं नाही, तर नव्या फोटोमध्ये केलेल्या गोलात पाहा.