रूममध्ये झोपलेल्या 4 मुलांपैकी एकजण रात्री लपून बाहेर गेला होता, जीनिअस असाल तर शोधाल उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 11:05 IST2023-09-14T10:59:34+5:302023-09-14T11:05:51+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण केला जातो. एका फोटोत वेगवेगळ्या गोष्टी लपलेल्या असतात.

रूममध्ये झोपलेल्या 4 मुलांपैकी एकजण रात्री लपून बाहेर गेला होता, जीनिअस असाल तर शोधाल उत्तर!
Optical Illusion Challenge: बरेच लोक दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन बघतात आणि त्यातील गोष्टी शोधत असतात. ज्याने त्यांचा टाइमपासही चांगला होतो आणि मेंदुही फ्रेश होतो. ऑप्टिकल इल्यूनज चॅलेंज सॉल्व करणं अनेकांना आवडतं. कारण याने मेंदुची कसरतही होते आणि डोळ्यांची टेस्टही होते.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण केला जातो. एका फोटोत वेगवेगळ्या गोष्टी लपलेल्या असतात. ज्या लोक सहजपणे शोधू शकत नाहीत. आज आम्हीही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चॅलेंज पूर्ण करायचं आहे.
वरच्या फोटोमध्ये तुम्हाला एक रूम दिसत आहे. यात काही मुले आरामात झोपलेली आहेत. पण यातीलच एकाने एक कारनामा केला आहे. एकजण रात्री झोपेतून उठून बाहेर गेला होता. तो कोण आहे हेच तुम्हाला शोधायचं आहे. पण यासाठी तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल. तरच तुम्ही यातील कारनामा करणारं मूल शोधू शकाल.
काही लोकांना यातील उत्तर सापडलं असेल. पण जर अजूनही तुम्हाला यातील उत्तर सापडलं नसेल तर निराश होऊ नका. उत्तर शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. तुम्हाला फक्त प्रत्येक मुलाला बारकाईने बघावं लागेल. यातील एका मुलीच्या पायांकडे बारकाईने बघा तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.