चॅलेंज! 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:50 IST2024-09-10T16:49:49+5:302024-09-10T16:50:29+5:30

Optical Illusion  : आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी एक ठराविक वेळ आहे.

Optical illusion: If your brain sharper than an eagle eye find the number 95 out of 99 numbers in 7 seconds | चॅलेंज! 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, ठराल जीनिअस!

चॅलेंज! 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, ठराल जीनिअस!

Optical Illusion  : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे असे फोटो सॉल्व करणं किंवा त्यातील गोष्टी शोधणं सगळ्यांना आवडतं. असे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी एक ठराविक वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम तर निर्माण करतात. पण सोबतच याद्वारे आपल्या मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. त्यामुळेच हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. मात्र, यात वेगळीच गंमत आहे. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला सगळीकडे 99 हा नंबर दिसत आहे. यात तुम्हाला 95 हा नंबर शोधायचा आहे. तोही केवळ 7 सेकंदात.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोद्वारे तुम्ही तुमची आयक्यू टेस्टही करू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि एकाग्र मन हवं. तरच तुम्ही हे चॅलेंज पूर्ण शकाल. जर तुम्ही बारकाईने हा फोटो पाहिला तर नक्कीच ठरलेल्या वेळात तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता.

तुम्हाला फोटोमध्ये 99 हा आकडा जास्तीत जास्त दिसत आहे. यातच तुम्हाला 95 हा आकडा शोधायचा आहे. यासाठी 7 सेकंद इतका भरपूर वेळ दिला आहे.  जर तुम्हाला अजूनही यातील 95 हा आकडा सापडला नसेल तर याचं उत्तर आम्ही खालच्या फोटोत दिलं आहे. थोड बारकाईने बघाल तर तुम्हाला हा आकडा लगेच दिसून येईल.

जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो कोणता आणि कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केला आहे. 

Web Title: Optical illusion: If your brain sharper than an eagle eye find the number 95 out of 99 numbers in 7 seconds