तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मांजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:12 IST2024-02-05T11:08:16+5:302024-02-05T11:12:07+5:30

Optical Illusion : एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.

Optical illusion : If you have highest visual skills find cat in the picture | तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मांजर!

तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मांजर!

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जे मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असे फोटो बघणं आणि त्यातील रहस्य उलगडणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. कारण यातून टाइमपासही चांगला होता आणि मेंदुची कसरतही होते. असाच एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.

तुमच्या डोळ्यांसमोर असलेल्या फोटोत एक बॅकयार्ड दिसत आहे. जिथे बरीच लाकडं ठेवलेली आहेत. यावर एक मांजर लपली आहे. फोटो पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला मांजर दिसून येणार नाही. यातील मांजर शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. इतक्या वेळेतच तुम्हाला मांजर शोधायची आहे. 

यातील मांजर शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फार बारकाईने बघावा लागेल. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच तुम्ही ही मांजर शोधू शकाल. तसेच याने तुमच्या मेंदुची चांगली कसरतही होईल.

जर तुम्ही या फोटोत लपलेली मांजर शोधली असले तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील मांजर दिसली नसेल तर निराश होऊ नका. तुम्ही एखाद्या दुसऱ्या फोटोतही हे चॅलेंज पूर्ण करू शकता. या फोटोतील मांजर कुठे लपली आहे हे तुम्ही खाली दिलेल्या फोटोत बघू शकता.


 

Web Title: Optical illusion : If you have highest visual skills find cat in the picture