'या' फोटोत किती पुस्तकं आहेत? बरेच लोक शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 11:01 IST2023-09-08T10:54:25+5:302023-09-08T11:01:18+5:30

Optical Illusion : तुमचे डोळे जर तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील पुस्तकांची संख्या सांगू शकाल. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.

Optical Illusion : How many books can you find this viral photo | 'या' फोटोत किती पुस्तकं आहेत? बरेच लोक शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

'या' फोटोत किती पुस्तकं आहेत? बरेच लोक शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच पझल, ऑप्टिकल इल्यूजन, ब्रेन टीजर आणि गणिताचे डोकं चक्रावून सोडणारे फोटो व्हायरल होत असतात. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या लोकांना हैराण करत आहे. भलेभले हुशार आणि बुद्धीमान लोकही या फोटोला बघून हैराण झाले आहेत. या फोटोत किती पुस्तकं आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तसं तर अनेकांना हे सोपं काम वाटतं. पण ते सोपं नाही. तुमचे डोळे जर तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील पुस्तकांची संख्या सांगू शकाल. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.

हा फोटो आर्टिस्टने फारच हुशारीने बनवला आहे. बरेच मास्टरमाइंड लोकही फोटो बघून कन्फ्यूज झाले आहेत. या फोटोत तुम्हाला एक तरूण आणि एक तरूणी पार्कमध्ये पिकनिकला आल्याचं दिसतं. त्यांनी पार्कमधील एका झाडाखाली एक चादर अंथरली आहे आणि आरामात बसून तरूण पुस्तक वाचत आहे. तर तरूणी मोबाइल बघत आहे. 

तेच दोघांच्या मागे एक व्यक्ती वॉक करताना दिसत आहे. दोघांच्या आजूबाजूला बऱ्याच वस्तू आहेत. जसे की, खाण्याच्या वस्तू, फुलं, झाडी इत्यादी. या सगळ्यांमध्ये काही पुस्तकं आहेत. पण सगळ्यांना फक्त तरूणाच्या हातातीलच पुस्तक दिसत आहे. पण यात एकूण 5 पुस्तकं आहेत.

बराच वेळ घेऊनही जास्तीत जास्त लोक या फोटोतील इतर पुस्तकं शोधू शकलेले नाहीत. अशात फोटो बारकाईने बघा. एक पुस्तक तरूणाच्या हातात आहे. दुसरं त्याच्या मागे असलेल्या झाडामागे पडलं आहे. तिसरं पुस्तक तरूणीजवळच्या बास्केटमध्ये आहे. चौथं पुस्तक फुलांजवळ ठेवलं आहे. तर पाचवं पुस्तक तरूण आणि तरूणीच्या मागे वॉक करत असलेल्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये आहे. काय मग....बसला ना धक्का...! 

Web Title: Optical Illusion : How many books can you find this viral photo