चॅलेंज! जीनिअस लोकच शोधू शकतील 'या' फोटोत लपलेला वाघ, तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 10:49 IST2024-05-21T10:48:52+5:302024-05-21T10:49:17+5:30

Optical Illusion : या फोटोतील वाघ शोधणं काही सोपं काम नाही. त्याला शोधण्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असायला हवेत.

Optical illusion : find the hidden tiger in this park scene in 10 seconds | चॅलेंज! जीनिअस लोकच शोधू शकतील 'या' फोटोत लपलेला वाघ, तुम्हीही ट्राय करा!

चॅलेंज! जीनिअस लोकच शोधू शकतील 'या' फोटोत लपलेला वाघ, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनसारखे गेम्स आपला मेंदू आणि डोळ्यांची कसरत करण्यास फार मदत करतात. कारण यांमध्ये तुम्हाला एकतर लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा फोटोंमधील फरक शोधायचे असतात. म्हणूनच लहान मुलांसोबत मोठ्यांनाही असे पझल्स सॉल्व करणं आवडतं. आईक्यू टेस्ट करण्याची सुद्धा ही एक खास पद्धत आहे. आज असंच एक मजेदार चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे चॅलेंज तुम्हाला सेकंदात पूर्ण करायचं आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक गार्डन दिसत आहे. ज्यात काही मुले खेळत आहेत, एक व्यक्ती त्याच्या कुत्र्याला फिरवत आहे. तर एक महिला फोन बघत असल्याचं दिसत आहे. यातच एक वाघही आहे. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे.

या फोटोतील वाघ शोधणं काही सोपं काम नाही. त्याला शोधण्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असायला हवेत. जर तुम्ही यातील वाघ शोधला तर नक्कीच सुपर स्मार्ट ठराल. ज्या लोकांचे डोळे चांगले आहेत त्यांना यात नक्कीच यश मिळेल. पण त्यासाठी तुमच्याकडे वेगळा दृष्टीकोन असायला हवा.

जर तुम्हाला 10 सेकंदात या फोटोतील वाघ दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही वाघ दिसला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या चॅलेंजमध्ये यश मिळेल. सध्या फोटोतील वाघ कुठे आहे ते बघुया. यातील वाघ कुठे आहे ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

Web Title: Optical illusion : find the hidden tiger in this park scene in 10 seconds