'जंगल' शब्दाच्या गर्दीत शोधायचाय 'मंगल' शब्द, डोळ्यांसोबतच मेंदुलाही चक्रावून सोडेल हे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:14 IST2025-08-05T13:14:07+5:302025-08-05T13:14:53+5:30
Optical Illusion : एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला 'जंगल'च्या गर्दीत 'मंगल' शब्द शोधायचा आहे.

'जंगल' शब्दाच्या गर्दीत शोधायचाय 'मंगल' शब्द, डोळ्यांसोबतच मेंदुलाही चक्रावून सोडेल हे चॅलेंज!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची सोशल मीडियावर चांगली क्रेझ बघायला मिळते. हे फोटो शेअर करून लोक एकमेकांना यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देऊन चांगला हेल्दी टाइमपास करतात. आता हेल्दी टाइमपास कसा? असा प्रश्न जर आपल्याला पडला असेलच...तर हेल्दी टाइमपास यासाठी होईल, कारण ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून डोळ्यांची आणि मेंदुची चांगली कसरत होते. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला 'जंगल'च्या गर्दीत 'मंगल' शब्द शोधायचा आहे.
आपल्या समोर आलेल्या फोटोत 'मंगल' हा शब्द इतक्या हुशारीनं लपवण्यात आला आहे की, तो सजहपणे शोधणं अवघड आहे. शोधून शोधून आपण कन्फ्यूजन व्हाल. कारण सगळीकडे 'जंगल' हा शब्द दिसत आहे. अशात डोळे चक्रावून जातील आणि समोरच असलेला 'मंगल' शब्द दिसणार नाही. आणि जेव्हा आपण मंगल शब्द शोधाल तेव्हा आनंद इतका होईल जणू आपण फार मोठं कोडं सोडवलंय.
'जंगल'मध्ये 'मंगल' शब्द शोधण्यासाठी आपल्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे फोटो बारकाईनं बघा आणि मंगल हा शब्द शोधून काढा. पण हे काही इतकंही सोपं काम नाही. त्यामुळे मेहनतीसाठी तयार रहा.
जर आपल्याला १० सेकंदात फोटोतील मंगल शब्द दिसला असेल तर आपलं अभिनंदन. खरंच आपली नजर तीक्ष्ण आहे. आणि ज्यांना अजूनही मंगल हा शब्द दिसला नसेल तर त्यांनी निराश होण्याची सुद्धा गरज नाहीये. कारण हा शब्द शोधण्यात आम्ही आपली मदत करणार आहोत. खालच्या फोटोत आपण मंगल शब्द सर्कल केलेला बघू शकता.
वरच्या फोटोत 'जंगल' शब्दाच्या गर्दीत 'मंगल' शब्द सर्कल केलेला पाहू शकता.