वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये लपला आहे एक जिराफ, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 14:03 IST2024-04-11T13:59:56+5:302024-04-11T14:03:24+5:30
Optical Illusion: अनेकदा काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात पण तरीही त्या आपण बघू शकत नाहीत किंवा एखाद्या फोटोतील एखादी गोष्ट शोधणं अवघड होतं.

वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये लपला आहे एक जिराफ, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होणं ही काही आता नवीन गोष्ट नाही. शेकडो ऑप्टिकल इल्यूजन फोटो जे डोळ्यांसमोर भ्रम तयार करतात ते व्हायरल होत असतात. हे फोटो लहानांही आवडतात आणि मोठ्यांनाही. कारण या फोटोतील रहस्य उलगडण्यात एक वेगळीच गंमत असते. सोबतच तुमच्या मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अनेकदा काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात पण तरीही त्या आपण बघू शकत नाहीत किंवा एखाद्या फोटोतील एखादी गोष्ट शोधणं अवघड होतं. बरेच लोक अशा फोटोंमधील गोष्टी शोधण्यात बराच वेळ घालवतात. कारण याने डोक्याला चालना मिळते. सोबतच चांगला टाइमपासही होतो.
आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये खूपसारी खेळणी दिसत आहे. ही खेळणी प्राण्यांची आहे. यात वेगवेगळे प्राणी आहेत. ज्यात तुम्हाला एक जिराफ शोधायचा आहे. हेच आजचं तुमचं चॅलेंज आहे. जे तुम्हाला केवळ 7 सेकंदात पूर्ण करायचं आहे.
जर तुम्हाला अजून यातील जिराफ दिसला नसेल तर जरा घाई करा कारण तुमची 7 सेकंदाची वेळ संपत आहे.
आतापर्यंत 99 टक्के लोक या फोटोत जिराफ शोधू शकलेले नाहीत. जर तुम्हालाही यातील जिराफ दिसला नसेल तर तुम्हाला एक हिंट देतो. यातील जिराफ फोटोच्या राइट साइडला आहे. जर अजूनही तुम्हाला जिराफ दिसला नसेल तर खालच्या फोटोत तुम्ही बघू शकता.