बाथरूमच्या या फोटोत आहे एक रहस्य, 7 सेकंदात शोधायचं आहे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 14:58 IST2023-12-09T14:57:38+5:302023-12-09T14:58:33+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे त्यातील गोष्टी शोधणं अवघड होतं.

बाथरूमच्या या फोटोत आहे एक रहस्य, 7 सेकंदात शोधायचं आहे चॅलेंज
Optical Illusion : सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे लोकांना खूप आवडतात. कारण या फोटोमुळे तुमच्या मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजून येतो. ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे त्यातील गोष्टी शोधणं अवघड होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बाथरूम आणि त्यात काही वस्तू दिसत आहेत. जसे की, टॉवेल, शाम्पू दिसत आहे. पण सांगण्यात आलं की, यात एक कारही आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला ही कार नक्की दिसेल. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. पण जास्तीत जास्त लोक यातील कार शोधण्यास अपयशी ठरले आहेत.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही 7 सेकंदात या बाथरूममधील कार शोधली असेल. जर असं झालं असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला कार दिसली नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही ती बघू शकता.