चॅलेंज! जीनिअस असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:07 IST2024-08-14T15:06:39+5:302024-08-14T15:07:37+5:30

Optical Illusion : या फोटोंच्या माध्यमातून तुमचं चांगलं मनोरंजन सुद्धा होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

Optical illusion : find hidden 67 number in picture in 10 second | चॅलेंज! जीनिअस असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर!

चॅलेंज! जीनिअस असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे त्यात समोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. यात एक वेगळीच गंमत असते. म्हणूनच लहानांसोबतच मोठ्यांना सुद्धा असे फोटो सॉल्व करणं आवडतं. कारण या फोटोंच्या माध्यमातून तुमचं चांगलं मनोरंजन सुद्धा होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 97 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ 97 नाही तर एक वेगळाही नंबर आहे. तो म्हणजे 67 हा आहे. हा नंबर फोटोत कुठे आहे ते शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे. हा नंबर तुम्हाला 10 सेकंदात शोधून काढायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूनज फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यात तुम्हाला वस्तू किंवा प्राणी शोधावे लागतात. तर कधी यातील फरक आणि वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काही सोपं काम नाही. तुमचे डोळे जर तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच 10 सेकंदात फोटोतील वेगळा नंबर शोधू शकाल.

जर ठरलेल्या वेळेत म्हणजे 10 सेकंदात तुम्ही फोटोतील वेगळा म्हणजे 67 हा नंबर शोधला असेल तर तुमचं अभिनंदन. तुम्ही जीनिअस तर आहातच सोबतच तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो कुठे लपवण्यात आला आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

वरच्या फोटोत तुम्ही हा वेगळा नंबर सर्कलमध्ये बघू शकता.

Web Title: Optical illusion : find hidden 67 number in picture in 10 second