99 टक्के लोक या फोटोतील झाडू शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हाला तरी जमतं का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:44 IST2024-04-25T13:41:36+5:302024-04-25T13:44:02+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्रेन टीजर घेऊन आलो आहोत. ज्यात खूपसारे कपडे दिसत आहेत त्यात तुम्हाला एक झाडू शोधायचा आहे.

99 टक्के लोक या फोटोतील झाडू शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हाला तरी जमतं का!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे तुमच्या मेंदुला आणि डोळ्यांना भ्रमात टाकतात. असा दावाही केला जातो की, जर तुम्ही नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व केले तर तुमचा मेंदू आणखी शार्प होतो. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्रेन टीजर घेऊन आलो आहोत. ज्यात खूपसारे कपडे दिसत आहेत त्यात तुम्हाला एक झाडू शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे एक मिनिटांची वेळ आहे.
फोटोत तुम्ही बघू शकता की, वेगवेगळ्या रंगाचे कपडे दिसत आहेत. यात एक झाडू लपवला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. हा फोटो हॅमंड्स फिटेड फर्निचरकडून बनवण्यात आला आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, हा फोटोतील रहस्य सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे एक मिनिटांची वेळ आहे. पण यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
झाडू या फोटोत फार हुशारीने लपवण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याला शोधण्यात अपयशी ठरले आहेत. जर तुम्हाला एक मिनिटात हा झाडू सापडला नाही तर निराश होऊ नका. कारण तुम्ही जेवढा जास्त वेळ फोटो बारकाईने बघाल तुम्हाला झाडू दिसून येईल.
खालच्या फोटोत तुम्ही झाडू स्पष्टपणे बघू शकता. पण वरच्या फोटोत तो असा सहजपणे दिसत नाही. पण रंग एकसारखे असल्याने यात कन्फ्यूजन जास्त होतं. अशात तुम्हाला झाडू शोधणं अवघड जातं. खालच्या फोटोत बघा झाडू कुठे आहे.