Optical Illusion: जीनिअस असाल तर 4 नंबरच्या गर्दीत लपलेला 8 नंबर शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 13:28 IST2023-05-24T13:25:24+5:302023-05-24T13:28:07+5:30
Optical Illusion : हा फोटो काही पेंटींग किंवा आर्ट नाही. यात तुम्हाला तुमचा मेंदू चालवायचा आहे. हा एखाद्या स्पर्धा परीक्षेसारखा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एक नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion: जीनिअस असाल तर 4 नंबरच्या गर्दीत लपलेला 8 नंबर शोधून दाखवा!
Optical Illusion Find The Number : जर तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व करणं आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक फारच चांगलं नंबर पझल आणलं आहे. यातील नंबर शोधण्यासाठी लोकांना मिनिटांचा नाही तर अनेक तासांचा वेळ लागला आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की, यात असं काय आहे? हा फोटो काही पेंटींग किंवा आर्ट नाही. यात तुम्हाला तुमचा मेंदू चालवायचा आहे. हा एखाद्या स्पर्धा परीक्षेसारखा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एक नंबर शोधायचा आहे.
या फोटोत तुम्हाला एखादा प्राणी किंवा वस्तू शोधायची नाही तर यातील एक नंबर शोधायचा आहे. यात तुम्ही सगळीकडे 4 हा नंबर बघत आहात. चॅलेंज हे आहे की, यात एक वेगळा नंबर आहे जो तुम्हाला शोधायचा आहे. हा फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं आहे. महत्वाची बाब म्हणजे यासाठी कोणतंही वेळेचं लिमिट नाही.
व्हायरल झालेला हा फोटो एका यूजरने ट्विटरवर शेअर केला होता आणि त्यानंतर लोकांनी हा शेअर केला. जसं की, तुम्ही फोटोत बघू शकता की सगळीकडे 4 हा नंबर आहे. ज्यात तुम्हाला 8 हा नंबर शोधायचा आहे. जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि तल्लख बुद्धी असेल तर तुम्ही हा नंबर शोधू शकाल. हे काम काही सोपं नाही, पण तल्लख बुद्धी असेल तर लगेच शोधू शकाल.
अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं असतं. तसंच या फोटोबाबत आहे. मुळात खाली देण्यात आलेल्या नंबरमध्ये कुठेच 8 हा नंबर नाही. तो प्रश्नात दिलेला 8 नंबरच याचं उत्तर आहे. काय म्हणता आली ना मजा?