Optical Illusion: डोळेही धोका खातील! या फोटोत आहेत सहा तरुणी, पण पाय दिसतायत फक्त पाच जणींचे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:01 IST2022-04-06T11:01:14+5:302022-04-06T11:01:33+5:30

Challenge for your Eyes: हिशोब लावता लावता लोकांच्या नाकीनऊ आले आहेत. असे कसे होईल. या तरुणी तर समोरच तोंड करून बसल्या आहेत.

Optical Illusion: Eyes will get cheat; There are six young women sitting on Sofa in this photo, but only five legs of them can be seen, Challenge for you | Optical Illusion: डोळेही धोका खातील! या फोटोत आहेत सहा तरुणी, पण पाय दिसतायत फक्त पाच जणींचे...

Optical Illusion: डोळेही धोका खातील! या फोटोत आहेत सहा तरुणी, पण पाय दिसतायत फक्त पाच जणींचे...

सोशल मीडियावर सध्या असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहताच क्षणी काहीतरी विचित्र भासत आहेत. त्या फोटोंतील गुढ शोधता सोधता भल्या भल्यांची बत्ती गुल होत आहे. हा फोटो समजून घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एकाग्र व्हावे लागणार आहे. कारण डोळ्यांना धोका देणारे या फोटोंतील रहस्य सहज सोपे नाहीय. 

या फोटोमध्ये तुम्हाला सहा तरुणी सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. परंतू त्यांचे पाय पाहिले तर ते पाच जणींचेच दिसतील. या फोटोत एका तरुणीचे पाय दिसत नाहीएत. हिशोब लावता लावता लोकांच्या नाकीनऊ आले आहेत. असे कसे होईल. या तरुणी तर समोरच तोंड करून बसल्या आहेत. मग पाच मुलींचेच पाय कसे काय दिसत आहेत. एका मुलीचे पाय कुठे गेले... 

या साठी तुम्हाला हा फोटो खूप निरखून पहावा लागणार आहेत. गायब असलेले दोन पाय खरेच दिसत नाहीएत. परंतू पहिल्या तीन मुली अशा स्थितीत बसल्या आहेत की एकीचा एक पाय आणि दुसरीचा एक पाय पायांमागे गायब झाले आहेत. अनेकजण म्हणताहेत की फोटोशॉपद्वारे पाय गायब केलेत. परंतू तसे नाहीय. 


 

Web Title: Optical Illusion: Eyes will get cheat; There are six young women sitting on Sofa in this photo, but only five legs of them can be seen, Challenge for you