Optical Illusion: फोटोत खड्डा आहे की सावली? जास्तीत जास्त लोक झाले कन्फ्यूज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 13:34 IST2024-04-05T13:28:01+5:302024-04-05T13:34:58+5:30
Optical Illusion : व्हायरल झालेला हा फोटो फारच कन्फ्यूज करणारा आहे. मोकळ्या मैदानात एक खड्डा असल्यासारखं दिसत आहे. पण....

Optical Illusion: फोटोत खड्डा आहे की सावली? जास्तीत जास्त लोक झाले कन्फ्यूज!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील पझल्स सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे आणि तल्लख बुद्धी असायला हवी. नाही तर यातील चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तासंतास वेळ लागू शकतो. कारण हे फोटो फारच हुशारीने बनवलेले किंवा चुकून तसे बनलेले असतात. म्हणजे फोटोत आपल्या समोर जे असतं ते दिसत नाही आणि जे दिसत नाही ते आपल्याला शोधायचं असतं. यात मेंदुची आणि डोळ्यांची चांगलीच कसरत होते. त्यामुळे असे फोटो लोकांना खूप आवडतात. असाच एक खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
जमिनीवर खड्डा आहे की गवताची पेंडी?
व्हायरल झालेला हा फोटो फारच कन्फ्यूज करणारा आहे. मोकळ्या मैदानात एक खड्डा असल्यासारखं दिसत आहे. पण लोकांना हे समजत नाहीये की, तिथे खरंच खड्डा आहे की ती गवताच्या पेंढीची सावली आहे. सामान्यपणे असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यासाठी लोकांना आपलं ऑब्जर्वेशन स्किल वापरावं लागतं. बरोबर उत्तर देण्यासाठी तुम्हाला हा फोटो बारकाईने बघावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल की, या ऑप्टिकल इल्यूजनच्या मागे कारण काय आहे.
काय आहे उत्तर?
पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हा फोटो बघता तेव्हा तुम्हाला यात जमिनीवरील एक खड्डा दिसतो. तर काही लोकांना यात गवताची पेंडी आणि त्याची सावली दिसते. आता तुम्हालाही काही समजलं नसेल तर गवताच्या पेंडींच्या कोपऱ्यांना बारकाईने बघा. तेव्हाच तुम्हाला खरं काय ते कळेल. यात नेमकं काय आहे याच उत्तर असं आहे की, यात एक गवताची पेंडी आणि त्याची सावली आहे. जी खड्डा असल्यासारखी दिसते.