भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोत आहे एक वेगळेपण, 12 सेकंदात ते शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 12:46 IST2023-04-27T12:45:15+5:302023-04-27T12:46:11+5:30

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोतील सगळं काही एकसारखं आहे. पण त्यात काहीतरी वेगळंही आहे. जे तुम्हाला 12 सेकंदात शोधायचं आहे.

Optical Illusion : Do you see anything strange in illusionary photo | भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोत आहे एक वेगळेपण, 12 सेकंदात ते शोधून दाखवा!

भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोत आहे एक वेगळेपण, 12 सेकंदात ते शोधून दाखवा!

Optical Illusion : फोटोंच्या माध्यमातून दिलं जाणारं चॅलेंज हे केवळ आपल्या मनोरंजनासाठी नसतं. तर त्यातून मेंदुची एक्सरसाइजही होते. फोटोत असलेल्या गोष्टी शोधण्यासाठी मेंदुला खूप मेहनत घ्यावी लागते. विचार करावा लागतो. तेव्हा कुठे या फोटोंमधील रहस्य आपण उलगडू शकत असतो. या फोटोंमुळे आपलं ऑब्जर्वेशन स्किल सोबत आपली आयक्यू टेस्टही होते.

BRIGHTSIDEOFFICIAL ने काही पझल फोटो शेअर करून ते सॉल्व्ह करण्याचं आव्हान दिलं आहे. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोतील सगळं काही एकसारखं आहे. पण त्यात काहीतरी वेगळंही आहे. जे तुम्हाला 12 सेकंदात शोधायचं आहे. तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण डोळे असणारेच ते शोधू शकतील.

या निळ्या-पांढऱ्या फोटोमध्ये असं काही वेगळं आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. ही एक चूक म्हणा किंवा पझल म्हणा. ते शोधायचं काम काही खायचं काम नाही. यासाठी तुमच्या डोळ्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. यात एक आकृती अशी आहे जी इतरांपेक्षा वेगळी आहे. 

या फोटो मनुष्याच्या काही आकृती आहेत. ज्या डावीकडे धावण्याच्या पोजिशनमध्ये आहे. या आकृतींचा आकार एकसारखा आहे. त्यांची संख्याही भरपूर आहे. पण यातील एक आकृती वेगळी आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे. जर बराच वेळ देऊनही तुम्हाला यातील वेगळी आकृती दिसली नसेल तर याचं उत्तर आम्ही खाली देत आहोत. यातील एक आकृती महिलेची आहे. 

Web Title: Optical Illusion : Do you see anything strange in illusionary photo