दगडांच्या मधोमध लपला आहे एक बिबट्या, तीक्ष्ण नजर असेल तर शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:03 IST2022-08-25T12:59:57+5:302022-08-25T13:03:14+5:30
Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एका बिबट्या लपला आहे. यातील बिबट्या शोधण्यासाठी तुम्हाला बारकाईने फोटो बघावा लागेल.

दगडांच्या मधोमध लपला आहे एक बिबट्या, तीक्ष्ण नजर असेल तर शोधून दाखवा!
Optical Illusion Leopard : अनेकदा आपल्या समोरच असलेल्या गोष्टी आपल्या सहजपणे दिसत नाहीत. सोशल मीडियावर नेहमीच असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक प्राणी लपला आहे. जो तुमच्या डोळ्यांसमोरच आहे, पण सहजपणे दिसत नाही. त्याला शोधावं लागतं. जर तुम्हाला तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर काही सेकंदात यातील प्राणी शोधून दाखवा.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एका बिबट्या लपला आहे. यातील बिबट्या शोधण्यासाठी तुम्हाला बारकाईने फोटो बघावा लागेल. बिबट्या अगदी तुमच्या समोरच आहे. पण दगडांच्या रंगासोबत त्याचा रंग मिक्स झाल्याने तो सहजपणे दिसणार नाही. यात मोठाले दगड आहेत ज्यांच्याजवळच बिबट्या उभा आहे. पण तुम्हाला डोकं आणि मन शांत ठेवून त्याला शोधावं लागेल तरच तो तुम्हाला दिसेल.
जर तुम्हाला बराच प्रयत्न करूनही यातील बिबट्या दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. तुम्ही फोटोच्या मधोमध नजर मारा. तुम्हाला तिथेच बिबट्या दिसेल. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकही हा फोटो इतरांसोबत शेअर करून लोकांना यातील बिबट्या शोधण्याचं चॅलेंज देत आहेत.