या वृद्ध व्यक्तीची हरवली आहे पत्नी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:12 IST2023-11-30T15:11:46+5:302023-11-30T15:12:09+5:30
Optical Illusion Challenge: बरेच लोक ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये रिकाम्या वेळेत रमतात. कारण याद्वारे मेंदुची कसरतही होते आणि डोळ्यांची टेस्टही होते.

या वृद्ध व्यक्तीची हरवली आहे पत्नी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज; तुम्हीही ट्राय करा!
Optical Illusion Challenge: आजकाल लोकांना सवय झाली आहे की, जराही रिकामा वेळ मिळाला तर ते मोबाइल घेऊन पोस्ट किंवा रील्स स्क्रॉल करत बसतात. यात अलिकडे लोकांना ऑप्टिकल इल्यूजन फोटोही सॉल्व करण्यात मजा वाटते. ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा कधी काही चुका काढायच्या असतात.
बरेच लोक ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये रिकाम्या वेळेत रमतात. कारण याद्वारे मेंदुची कसरतही होते आणि डोळ्यांची टेस्टही होते. सोबतच तुमच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजून येतो. रील्स बघायचं सोडून तुम्हाला दुसरं काही करायचं असेल तर ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं बेस्ट टाइमपास ठरेल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे लोक त्यात नेमकं काय आहे ते बघण्यात कन्फ्यूज होतात. हे फोटो फारच हुशारीने आणि विचार करून तयार केलेल असतात. जेणेकरून तुमच्या मेंदुची खूप चांगली कसरत व्हावी. असाच एक खास ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
कुठे आहे आहे या व्यक्तीची पत्नी?
हा फोटो Bright Side कडून तयार करण्यात आला आहे. या फोटोत तुम्हाला एक वयोवृद्ध व्यक्ती चिंतेत दिसत आहे. कारण त्याला त्याची पत्नी दिसत नाहीये. ती या फोटोतच कुठेतरी आहे. जर तुम्हाला तिला शोधण्यात त्यांची मदत करायची असेल तर करू शकता. पण यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही या फोटोतील महिला शोधली असेल. जर 5 सेकंदात तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पण अजूनही जर तुम्हाला हे जमलं नसेल तर निराश होऊ नका. तिला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही बघू शकता.