Optical Illusion: या फोटोतील झाडावर लपला आहे एक साप, 15 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 17:18 IST2023-06-07T17:16:28+5:302023-06-07T17:18:04+5:30
Optical Illusion : बरेच लोक यातील रहस्य किंवा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण काहीच लोकांना यात यश मिळतं. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Optical Illusion: या फोटोतील झाडावर लपला आहे एक साप, 15 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडीओज पोस्ट केले जातात. ज्यातील काही फोटोंमध्ये प्रश्न विचारलेले असतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. ऑप्टिकल इल्यूजनने डोळ्यांसमोर भ्रम निर्माण होतो. बरेच लोक यातील रहस्य किंवा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. पण काहीच लोकांना यात यश मिळतं. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका झाडावर साप लपला आहे. हा साप तुम्हाला शोधायचा आहे.
या फोटोत तुम्हाला एक कलरफुल झाड दिसत आहे. याच झाडावर कुठेतरी एक साप लपला आहे. हा शोधण्यासाठी तुम्ही 15 सेकंदाचा टायमर लावा. याने तुमच्या नजरेची आणि मेंदूची टेस्ट होईल. तसेच तुमचा वेळही चांगला जाईल. फार कमी लोकांना यातील साप सापडला. सापाला शोधण्यासाठी तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल.
अनेक लोकांनी साप शोधण्यासाठी खूप वेळ घेतला, पण त्यांना साप काही सापडला नाही. जर तुम्हाला खूप प्रयत्न करूनही साप दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. साप पांढऱ्या रंगाचा आहे आणि तो डाव्या बाजूला आहे. जर हे सांगूनही तुम्हाला फोटोतील साप दिसला नसेल तर खालच्या फोटोत याचं उत्तर दिलं आहे.
हा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक हा फोटो शेअर करून इतरांना साप शोधण्याचं चॅलेन्ज देत आहेत. ऑप्टिकल इल्यूजून फोटो इतके मजेदार असतात की, लोकांना ते सॉल्व करणं खूप आवडतं. इतकंच नाही तर याने तुमच्या नजरेची आणि मेंदूची टेस्टही होते.