कोडं सोडवण्यात स्वत:ला एक्सपर्ट समजत असाल तर शोधा फोटोतील कुत्रा, फक्त १० सेकंदाची आहे वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:01 IST2026-01-17T13:35:38+5:302026-01-17T14:01:25+5:30

Optical Illusion : या फोटोत पहिल्या नजरेत दाढी असलेला एक वृद्ध माणूस दिसतो. मात्र या गोंधळात टाकणाऱ्या चित्रात एक कुत्रा लपलेला आहे, जो शोधण्याचं आव्हान युजर्सना दिलं जात आहे.

Optical Illusion : Can you spot the hidden dog in this photo in 10 seconds | कोडं सोडवण्यात स्वत:ला एक्सपर्ट समजत असाल तर शोधा फोटोतील कुत्रा, फक्त १० सेकंदाची आहे वेळ

कोडं सोडवण्यात स्वत:ला एक्सपर्ट समजत असाल तर शोधा फोटोतील कुत्रा, फक्त १० सेकंदाची आहे वेळ

Optical Illusion: हल्ली सध्या सोशल मीडियावर एक अतिशय कठीण ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्यूजन अनेकदा आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला फसवतात. ते आपल्याला प्रत्यक्षात जे आहे त्यापेक्षा वेगळंच काहीतरी दाखवतात. असे भ्रम दाखवतात की आपला मेंदू आकार, रंग किंवा कोनांमुळे किती सहज गोंधळून जाऊ शकतो. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन आहे, ज्यामध्ये पहिल्या नजरेत दाढी असलेला एक वृद्ध माणूस दिसतो. मात्र या गोंधळात टाकणाऱ्या चित्रात एक कुत्रा लपलेला आहे, जो शोधण्याचे आव्हान युजर्सना दिले जात आहे. 

हे ऑप्टिकल इल्यूजन इंस्टाग्रामवर @delicatessence786 आणि @fortbendmd या हँडल्सवर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, “येथे काही मजेदार अ‍ॅक्टिव्हिटीज दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचा मेंदू प्रशिक्षित करू शकता आणि दृष्टी अधिक तीक्ष्ण करू शकता. हे प्रसिद्ध ऑप्टिकल इल्यूजन आहेत. यामध्ये दोन पूर्णपणे वेगवेगळ्या प्रतिमा ओळखण्यासाठी तुम्हाला अधिक लक्ष देऊन पाहावे लागेल.” पहिल्या नजरेत तुम्हाला दाढीवाला वृद्ध माणूस दिसतो, जो कदाचित डोळे बारीक करत आहे किंवा खोल विचारात मग्न आहे. पण यात एक लपलेला सरप्राइज आहे. आव्हान असे आहे की, १० सेकंदांत त्यामधील लपलेला कुत्रा शोधायचा आहे.


लपलेला कुत्रा दिसल्यानंतर अनेक इंस्टाग्राम युजर्स चकित झाले. काहींनी कबूल केले की, कुत्रा शोधण्यासाठी त्यांना अनेकदा प्रयत्न करावे लागले. एका युजरने कमेंट केली, “मला कमेंट्स वाचल्यावर समजलं, पण आता डोळे दुखायला लागले आहेत, उफ्फ!” दुसऱ्याने लिहिलं, “मला वाटलं कुत्रा हाडासोबत लपाछपी खेळत आहे, जोपर्यंत मी फोन उलटा केला नाही.” तर तिसऱ्याने सल्ला दिला, “चित्र उलटं करून पाहा, तुम्हाला त्या दाढीमध्ये लपलेला कुत्रा दिसेल.”

ऑप्टिकल इल्यूजन मेंदूसाठी फायदेशीर का?

अशा प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन केवळ पाहायला मनोरंजक नसतात, तर ते मेंदूला उपयुक्त पद्धतीने आव्हानही देतात. हे एकाग्रता, पॅटर्न ओळखण्याची क्षमता आणि सर्जनशील विचारशक्ती वाढवणाऱ्या महत्त्वाच्या भागांना सक्रिय करतात.

Web Title : ऑप्टिकल इल्यूजन: क्या आप 10 सेकंड में कुत्ते को ढूंढ सकते हैं?

Web Summary : एक चुनौतीपूर्ण ऑप्टिकल इल्यूजन ऑनलाइन प्रसारित हो रहा है, जिसमें एक बूढ़े आदमी की छवि में एक छिपा हुआ कुत्ता है। यूजर्स को 10 सेकंड से कम समय में कुत्ते को ढूंढने की चुनौती दी गई है। यह अवलोकन कौशल का परीक्षण करता है।

Web Title : Optical Illusion: Can you spot the dog in 10 seconds?

Web Summary : A challenging optical illusion is circulating online, featuring a hidden dog within an image of an old man. Users are challenged to find the dog in under 10 seconds. This tests observation skills and sharpens the mind.