Optical Illusion : भलेभले या फोटोतील साप शोधून झाले घामाघूम, तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 13:40 IST2023-04-28T13:35:13+5:302023-04-28T13:40:59+5:30
Optical Illusion : तुम्ही याआधीही अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य शोधलं असेल. डेली स्टारकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात चॅलेंज देण्यात आलं आहे की, वाळलेल्या आणि हिरव्या गवतामध्ये एक साप लपून बसला आहे.

Optical Illusion : भलेभले या फोटोतील साप शोधून झाले घामाघूम, तुम्हीही ट्राय करा!
Optical Illusion Challenge: अनेकदा काही फोटो असे क्लीक केले जातात ज्यात जे असतं ते दिसत नाही. या फोटोंची खासियतच ही असते की, तुम्ही खरं काय ते ओळखू शकत नाहीत. सध्या असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात लोक साप शोधण्यात हैराण झाले आहेत.
तुम्ही याआधीही अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य शोधलं असेल. डेली स्टारकडून एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात चॅलेंज देण्यात आलं आहे की, वाळलेल्या आणि हिरव्या गवतामध्ये एक साप लपून बसला आहे. तसा तर साप समोरच आहे. पण त्याला शोधण्यासाठी तीक्ष्ण डोळे हवे आहेत.
Ohio Department of Natural Resources कडून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लोकांना चॅलेंज करण्यात आलं आहे की, या फोटोत एक साप आहे. पण त्याला शोधण्यात मेहनत करावी लागेल. जर तुम्ही 10 सेकंदात तुम्ही सापाल शोधाल तुमचं ऑब्ज़र्वेशन स्किल फार चांगलं आहे.
या फोटोतील साप शोधणं काही सोपं काम नाही. कारण साप गवतामध्ये असा काही लपला आहे की, तो सहजपणे दिसणार नाही. ज्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत तेच या सापाला शोधू शकतील. जर अजूनही उत्तर सापडलं नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.