Optical Illusion : या फोटोमध्ये लपवले आहेत 8 स्टार, 20 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:13 IST2023-05-17T17:03:58+5:302023-05-17T17:13:25+5:30
Optical Illusion : आम्ही तुमच्यासाठी एक Sweet Summer Days चा फोटो घेऊन आलो आहोत. जो बघताच तुम्हाला गरमीपासून आराम मिळेल.

Optical Illusion : या फोटोमध्ये लपवले आहेत 8 स्टार, 20 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : एखादी गोष्ट शोधण्याचे गेम्स फारच मजेदार असतात. यांनी टाइमपासही चांगला होतो आणि सोबतच थकवा व स्ट्रेसही लगेच दूर होतो. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. हे फोटो दिसायला साधारण असतात, पण या फोटोंमध्ये अशा गोष्टी लपलेल्या असतात ज्या डोळ्यांसमोर असूनही आपल्याला दिसत नाहीत. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. ज्यात तुम्हाला स्टार शोधायचे आहेत.
आम्ही तुमच्यासाठी एक Sweet Summer Days चा फोटो घेऊन आलो आहोत. जो बघताच तुम्हाला गरमीपासून आराम मिळेल. यात उन्हाळ्यातील वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या आईस्क्रीम दाखवण्यात आल्या आहेत.
यांमध्ये 8 छोटे छोटे स्टार लपवलेले आहेत. जे तुम्हाला 20 सेकंदात शोधायचे आहेत. पण हे काम इतकंही सोपं नाही. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवेत.
हे स्टार तसे तर तुमच्या डोळ्यांसमोरच आहेत. पण त्यांना असं लपवण्यात आलं आहे जेणेकरून तुम्हाला ते शोधण्यासाठी वेळ लागेल. जर तुम्ही ते बघू शकत असाल तर तुम्ही खरंच मास्टरमाइंड आहात. पण जर बराच वेळ होऊनही तुम्हाला ते दिसले नसतील तर खाली उत्तर आहे.