Optical Illusion: या जंगलात लपलं आहे हरिण, अनेकजण शोधण्यात झाले फेल; तुम्हीही ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 09:51 IST2022-11-09T09:48:59+5:302022-11-09T09:51:30+5:30
Optical Illusion : या फोटोमध्ये एक हरिण लपलं आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. पण ते काही खायचं काम नाही. त्यासाठी तुमची नजर फार चांगली असणं गरजेचं आहे.

Optical Illusion: या जंगलात लपलं आहे हरिण, अनेकजण शोधण्यात झाले फेल; तुम्हीही ट्राय करा
Solve This Puzzle: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन शेअर केले जातात. यातील अनेक इल्यूजन सॉल्व करता करता अनेकांच्या नाकी नऊ येतात. असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाला असून यातील गुपित शोधण्यात लोकांना मजा येत आहे. या फोटोमध्ये एक हरिण लपलं आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. पण ते काही खायचं काम नाही. त्यासाठी तुमची नजर फार चांगली असणं गरजेचं आहे.
या फोटोत तुम्हाला एक जंगल दिसत आहे. खूप झाडांच्या मधोमध एक हरिण लपलं आहे. या फोटोतील योग्य उत्तर शोधण्यासाठी फोनमध्ये 20 सेकंदाचा टायमर सेट करा. या फोटोकडे बारकाईने पाहिलं तरच तुम्हाला हरिण दिसू शकेल.
जर तुम्हाला अजूनही बरोबर उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या डाव्या बाजूला हरिण शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आता हरिण दिसलं असेल तर अभिनंदन. तुमचे डोळे आणि मेंदू शार्प आहे. ज्यांना अजून हरिण दिसलं नाही ते खालील फोटोत बघू शकतात.
तुम्ही वाचून हैराण व्हाल की, यातील हरिण शोधणाऱ्या लोकांचं प्रमाण फार कमी आहे. हा फोटो अशाप्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की, यात सहजपणे हरिण दिसत नाही.