फोटोतील 5 मांजरी शोधण्याचं आहे चॅलेंज, तीक्ष्ण डोळे असतील तर ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 10:49 IST2023-10-28T10:48:59+5:302023-10-28T10:49:23+5:30

Optical Illusion : तुम्हाला या फोटोतील पाच मांजरी शोधायच्या आहेत. पण हे काम वाटतं तेवढं सोपं अजिबात नाही.

Optical Illusion : Can you spot hidden 5 cats in 30 seconds | फोटोतील 5 मांजरी शोधण्याचं आहे चॅलेंज, तीक्ष्ण डोळे असतील तर ट्राय करा!

फोटोतील 5 मांजरी शोधण्याचं आहे चॅलेंज, तीक्ष्ण डोळे असतील तर ट्राय करा!

Optical Illusion : जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर हे ब्रेनटीजर तुमच्यासाठीच आहे. हा फोटो सोशल मीडियावर लोकांच्या डोळ्यांची टेस्ट घेण्यासाठी शेअर केलाय. यात एक हेलोवीन सीन दाखवला आहे. ज्यात पाच मांजरी लपवण्यात आल्या आहेत. तुमच्यासाठी चॅलेंज हेच आहे की, तुम्हाला या फोटोतील पाच मांजरी शोधायच्या आहेत. पण हे काम वाटतं तेवढं सोपं अजिबात नाही.

सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्याद्वारे तुमचा टाइमपासही होतो आणि तुमच्या डोळ्यांची टेस्टही होते. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर SpinGenie हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये हेलोवीनचा सीन बनवण्यात आला आहे. यात काही मुले कॉस्ट्यूम घालून दिसत आहेत. ही मुले बागेत खेळत आहेत. तर काही मोठे लोकही इथे आहेत. त्यांच्या मधे पाच मांजरी लपवण्यात आल्या आहेत. ज्या तुम्हाला शोधायच्या आहेत. 

सामान्यपणे अशा फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी 10 ते 15 सेकंदाची वेळ दिली जाते. पण या फोटोतील मांजरी शोधण्यासाठी तुम्हाला 30 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. कारण यातील मांजरी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जर तुम्हाला 30 सेकंदात यातील मांजरी दिसल्या तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिसल्या नसतील तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत मांजरींना सर्कल केलं आहे.

Web Title: Optical Illusion : Can you spot hidden 5 cats in 30 seconds