रूममध्ये लपला आहे एक उंदीर, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 15:43 IST2024-03-04T15:40:06+5:302024-03-04T15:43:15+5:30
Optical Illusion : यात तुम्हाला एखादी गोष्ट शोधायची असते किंवा त्यातील चूक शोधायची असते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

रूममध्ये लपला आहे एक उंदीर, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Spot The Object Puzzle : सोशल मीडियावर आजकाल वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे तुमचं चांगलं मनोरंजन करतात आणि तुमच्या मेंदुची यामुळे कसरतही चांगली होते. त्यामुळे हे फोटो लहानांपासून ते मोठ्यांना सगळ्यांना आवडतात. हे फोटो तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. यात तुम्हाला एखादी गोष्ट शोधायची असते किंवा त्यातील चूक शोधायची असते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Bright Side कडून शेअर करण्यात आलेल्या या फोटोमुळे तुमची ऑब्जर्वेशन आणि फोकस करण्याची क्षमताही कळून येईल. तसेच तुमच्या प्रेजेंस ऑफ माइंडचीही टेस्ट होईल. या फोटोत एक लायब्ररी दिसत आहे. या वेगवेगळ्या वस्तूंसोबत एक मांजर आणि तिची मालक रागावताना दिसत आहे. आता तुम्हाला यात एक उंदीर शोधायचा आहे. जो बघून महिला चिडली आहे.
लायब्ररीच्या या फोटोत एक उंदीर लपून बसला आहे. ज्यावर महिलेची नजर पडली आहे. तिला माहीत आहे की, इथे जर उंदीर राहिला तर तिची पुस्तके खराब होतील. अशात ती मांजरीवर रागवत आहे. आता यातील उंदीर शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला 7 सेकंदात पूर्ण करायचं आहे.
तसं यातील उंदीर शोधण्याचं काम फार अवघड आहे. पण जर तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला उंदीर लगेच दिसेल. उंदीर शेल्फमध्ये बसलेला आहे.