Optical illusion : फोटोमध्ये लपला आहे एक खेकडा, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 17:51 IST2023-05-01T17:48:43+5:302023-05-01T17:51:48+5:30
Optical Illusion : या फोटोंमध्ये कधी तुम्हाला काही शोधायचं असतं तर कधी यातील चुका काढायच्या असतात. असाच फोटो आम्ही घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक खेकडा शोधायचा आहे.

Optical illusion : फोटोमध्ये लपला आहे एक खेकडा, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो लोकांना सहजपणे कन्फ्यूज करतात. या फोटोंच्या माध्यमातून वेगवेगळी पझल्स आणि गेम खेळायला मिळतात. ज्याने बुद्धीला चालना मिळते. या फोटोंमध्ये कधी तुम्हाला काही शोधायचं असतं तर कधी यातील चुका काढायच्या असतात. असाच फोटो आम्ही घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक खेकडा शोधायचा आहे.
तुम्ही यात फोटोत बघू शकता की, समोर बरीच खेळणी पडली आहे. या खेळण्यांचा वापर बीचवर वाळूने इमारती आणि वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी करण्यात आला आहे. या फोटोत एका ठिकाणी वाळूचा ढीग आहे. याच फोटोत एक खेकडा लपला आहे. ज्याला तुम्हाला 10 सेकंदात शोधायचं आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही किंवा तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही मेहनतीने यातील खेकडा नक्की शोधाल. इतकंच नाही तर हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्हीही तुमची मदत करू.
या फोटोत खेकडा अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण तो इतक्या चलाखीने लपला आहे की, बरेच लोक त्याला शोधण्यात अपयशी ठरत आहेत. चला तर मग जाणून घेऊ कुठे लपला आहे खेकडा. फोटोत तुम्हाला एक निळ्या रंगाची मोठी बकेट दिसत असेल. जर तुमची नजर बकेटीच्या डावीकडे वळवली तर तुम्हाला यातील खेकडा दिसेल.