तीक्ष्ण डोळे असणारेही शोधू शकत नाहीयेत या फोटोतील पक्षी, तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 15:54 IST2023-05-25T15:33:24+5:302023-05-25T15:54:37+5:30
Optical Illusion : आम्ही आज तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक पक्षी शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.

तीक्ष्ण डोळे असणारेही शोधू शकत नाहीयेत या फोटोतील पक्षी, तुम्हीही ट्राय करा!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. पण या फोटोंनी लोकांचं चांगलं मनोरंजन होतं. सोबतच डोळे आणि मेंदुची टेस्टही होते. तुमच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो. आम्ही आज तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक पक्षी शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.
तुम्ही बघू शकता की, या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे दगड दिसत आहेत. सोबतच थोडंफार गवतही दिसत आहे. यातच एक पक्षी लपला आहे. पण त्याला शोधणं इतकंही सोपं काम नाही. त्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे.
जर तुम्ही 10 सेकंदात हे चॅलेंज पूर्ण केलं असेल तर खरंच तुमचे डोळे फार तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला अजूनही यातील पक्षी दिसला नसेल तर हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो.
फोटोमध्ये पक्षी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला इतक्या चलाखीने लपवण्यात आलं आहे की, भलेभले लोक त्याला शोधण्यात अपयशी ठरले.
बऱ्याच लोकांना असं वाटत आहे की, या फोटोत पक्षीच नाहीये. पण तुम्ही फोटोत डावीकडे बारकाईने बघाल तर दगडांच्या रंगाचाच एक पक्षी दिसले. अजूनही दिसला नसेल तर खालच्या फोटोत तो कुठे आहे हे बघू शकता.