फोटोत लपवले आहेत 6 इंग्रजी शब्द, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेजं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:37 IST2023-06-23T12:32:59+5:302023-06-23T12:37:59+5:30

Optical Illusion : सामान्यपणे जास्तीत जास्त फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. पण आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोमध्ये तुम्हाला काही इंग्रजी शब्द शोधायचे आहेत.

Optical Illusion : Can you spot 6 English words in 15 seconds | फोटोत लपवले आहेत 6 इंग्रजी शब्द, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेजं!

फोटोत लपवले आहेत 6 इंग्रजी शब्द, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेजं!

Can You Find 6 English Words: काही फोटो फार रहस्यमय असतात आणि त्यातील रहस्य शोधणं फार मजेदार व कठिण काम असतं. असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्याला संभ्रमित करतात. या फोटोंमुळे तुमचं मनोरंजन तर होतंच सोबतच तुमच्या मेंदुची कसरतही होते. असाच एक फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही इंग्रजी शब्द शोधायचे आहेत.

सामान्यपणे जास्तीत जास्त फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. पण आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोमध्ये तुम्हाला काही इंग्रजी शब्द शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाचा वेळ आहे. यात 6 इंग्रजी शब्द लपले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत 6 इंग्रजी शब्द वेगवेगळ्या ठिकाणी लपले आहेत. हे काही फार अवघड नाही, पण तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाचा वेळ आहे. ज्यात तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे. 

जे लोक जीनिअस असतील त्यांनी नक्कीच यातील शब्द शोधले असतील. पण ज्यांना अजून यातील शब्द सापडले नाहीत त्यांनी निराश होऊ नये. आम्ही तुमची मदत करतो. यात जे शब्द लपले आहेत ते थंडीशी संबंधित आहेत.

जर अजूनही तुम्हाला शब्द सापडले नसतील तर ते शब्द काय आहेत हे आम्ही सांगतो. जे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता. ते शब्द आहेत chill, sled, frost, cold, toboggan, ice.

Web Title: Optical Illusion : Can you spot 6 English words in 15 seconds