चॅलेंज! 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील एक चोर, ९५ टक्के लोक झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 16:41 IST2024-11-02T16:30:47+5:302024-11-02T16:41:30+5:30

Optical Illusion : कधी यात फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चोर शोधायचा आहे. 

Optical illusion : Can you find thief in this picture in 7 second | चॅलेंज! 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील एक चोर, ९५ टक्के लोक झाले फेल!

चॅलेंज! 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील एक चोर, ९५ टक्के लोक झाले फेल!

Optical Illusion : आम्ही रोज तुमच्यासाठी वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन येत असतो. जेणेकरून तुमचं मनोरंजन व्हावं आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळावी. या फोटोंमधील गोष्टी शोधून तुमची आयक्यू टेस्टही होते. कधी या फोटोंमध्ये वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात, तर कधी यात फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चोर शोधायचा आहे. 

तुमच्यासमोर एक फोटो आहे ज्यात काही लोक रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसत आहेत. फोटो बघून असं वाटत आहे की, सगळे लोक एका कॉस्च्यूम पार्टीमध्ये आले आहेत. लोक वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. या लोकांमध्ये एक चोरही लपला आहे. तुम्हाला याच चोराला शोधायचं आहे. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे. 

जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच चोर शोधू शकाल. पण जर तुम्ही चॅलेंज पूर्ण करू शकत नसाल तर निराशही होऊ नका. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. 

फोटोमध्ये चोर एकदम तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण तो चोरी इतक्या शांतपणे करत आहे की, भलेभले लोक त्याला पकडू शकत नाहीयेत. चला आम्ही सांगतो चोर कुठे आहे. फोटोत तुम्हाला एक व्यक्ती निन्जा ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याच्यामागे एक मुलगी उभी आहे. ती मुलगी त्याच्या खिशातून काहीतरी चोरी करत आहे.

वरच्या फोटोत चोर सर्कल केला आहे. 
 

Web Title: Optical illusion : Can you find thief in this picture in 7 second