जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील साप, बरेच ठरले अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:45 IST2023-09-26T12:40:29+5:302023-09-26T12:45:47+5:30
Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 7 सेकंदाच्या आत एक साप शोधायचा आहे.

जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील साप, बरेच ठरले अपयशी
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अशा फोटोंमध्ये जे दिसतं ते नसतं, जे असतं ते दिसत नाही. बऱ्याच लोकांना अशा फोटोंमधील रहस्य शोधण्यात मजा येते. काही फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 7 सेकंदाच्या आत एक साप शोधायचा आहे.
हा फोटो एका नदीच्या किनाऱ्यावरील वाटत आहे. ज्यात तुम्हाला थोडं पाणी थोडी कोरडी जमीन दिसत आहे. जर तुम्ही फोटोचा कानाकोपरा बारकाईने बघाल तर तुम्हाला तो नक्कीच दिसेल. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी. तरच तुम्ही हे काम करू शकाल.
7 सेकंदाचा वेळ घेऊन तुम्हाला यातील साप दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनीअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहे. पण जर अजूनही तुम्हाला या फोटोतील साप दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत साप कुठे आहे हे तुम्ही बघू शकता.