फोटोत आहे एक चूक, १० सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:10 IST2024-06-21T13:03:58+5:302024-06-21T13:10:05+5:30

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.

Optical illusion : Can you find the mistake in the picture in 10 seconds | फोटोत आहे एक चूक, १० सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!

फोटोत आहे एक चूक, १० सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जे लोकांना खूप आवडतात. कारण यातून चांगलं मनोरंजनही होतं आणि मेंदुची कसरतही चांगली होते. हे फोटो फोटो तुमच्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे तुम्हाला यातील गोष्टी सहजपणे शोधता येत नाहीत. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.

आज आम्ही तुमच्यासाठी चॅलेंज म्हणून घेऊन आलेल्या फोटोत तुम्हाला एक चूक शोधायची आहे. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक मुलगी आणि एक श्वान दिसत आहे. पाऊस येत आहे. काही झाडंही दिसत आहेत. पण यात एक चूक आहे. जर तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच यातील चूक शोधू शकाल.

फोटोत एक चूक आहे जी शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्ही नक्कीच ठरलेल्या वेळेत यातील चूक शोधू शकाल. चला तर मग लागा कामाला.

जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोतील चूक सापडली असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही चांगले आहेत. पण जर अजूनही चूक सापडले नसतील तर निराश होऊ नका. कारण ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही चूक बघू शकता.

फोटोत तुम्हाला कासव झाडावर चढल्याचं दिसत आहे. कासव झाडावर कधी चढूच शकत नाही. हीच या फोटोतील चूक आहे.

Image Source- Brightside

Web Title: Optical illusion : Can you find the mistake in the picture in 10 seconds