माकडांच्या गॅंगमध्ये लपलं आहे एक अस्वल, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 10:29 IST2023-10-02T10:27:45+5:302023-10-02T10:29:59+5:30

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी तीक्ष्ण डोळे असणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही यात यशस्वी होऊ शकत नाहीत.

Optical illusion : Can you find out the beer sitting between the group of monkeys | माकडांच्या गॅंगमध्ये लपलं आहे एक अस्वल, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

माकडांच्या गॅंगमध्ये लपलं आहे एक अस्वल, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या मनोरंजनाचा आधार घेतात. आजकाल यासाठी काही पझल्स आणि गेम्स खेळले जातात. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. जे सॉल्व करायला लोकांना खूप आवडतात. या फोटोंमध्ये काहीतरी शोधायचं असतं नाही तर त्यातीच चुका शोधायच्या असतात. पण हे काम काही सोपं नसतं. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधण्यासाठी तीक्ष्ण डोळे असणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही यात यशस्वी होऊ शकत नाहीत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत माकडांची एक गॅंग बसलेली दिसत आहे. सगळीच माकडं वेगवेगळी कामं करत आहेत. त्यांच्या मधे एक अस्वल लपलेलं आहे. त्यालाच तुम्हाला शोधायचं आहे. यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 

7 सेकंदात बऱ्याच लोकांनी माकडांमध्ये लपलेलं अस्वल शोधलं असेल तुमचे डोळे खरंच चांगले आहेत. पण अजूनही तुम्हाला यातील अस्वल दिसलं नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत ते कुठं बसलंय ते दिसतं.

Web Title: Optical illusion : Can you find out the beer sitting between the group of monkeys