डायनिंग हॉल दिसत असलेल्या फोटोत आहे एक चूक, जीनिअस असाल तर शोधून दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:01 IST2025-10-10T16:56:42+5:302025-10-10T17:01:09+5:30
Optical Illusion : असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्या मनोरंजनासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक डायनिंग हॉल दिसत आहे.

डायनिंग हॉल दिसत असलेल्या फोटोत आहे एक चूक, जीनिअस असाल तर शोधून दाखवा
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो किंवा ब्रेनटीजर एक पझल असतात, ज्यासाठी तुमच्याकडे रचनात्मक आणि तार्किकतेची गरज असते. अशा फोटोंनी तुमची आयक्यू टेस्टही होते आणि डोळ्यांची दृष्टी कशी आहे तेही समजतं. म्हणूनच तर डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असे फोटो सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडतात. यातील रहस्य उलगडताना मेंदूची कसरत तर होतेच, सोबतच आपलं ऑब्जर्वेशन स्किलही चांगलं होतं.
असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही आपल्या मनोरंजनासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात आपल्याला एक डायनिंग हॉल दिसत आहे. ज्यात काही लोकही आहेत. पण या फोटोत एक चूक आहे. जी तुम्हाला 20 सेकंदामध्ये शोधून काढायची आहे. यावरून तुमची नजर किती तीक्ष्ण आहे हे दिसून येतं.
या फोटोतील चूक शोधण्यासाठी आपल्याला डिटेक्टिवसारखा मेंदू आणि नजर तीक्ष्ण पाहिजे. तेव्हाच तुम्ही यातील चूक शोधू शकाल. ही चूक शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी फार बारकाईने फोटो बघावा लागेल. तेव्हा यश नक्कीच मिळेल.
फोटोतील चूक शोधण्यासाठी आपल्यालाला 20 सेकंदाची वेळ देण्यात आली होती. काही लोकांनी यातील चूक शोधली असेल तर काही लोक अजूनही यातील चूक शोधत असतील. अशात त्यांच्यासाठी यातील चूक आम्हीच तुम्हाला सांगणार आहोत.
बारकाईने बघाल तर डायनिंग हॉलमध्ये उजवीकडे तुम्हाला एक लाकडी कपाट दिसेल. त्याच्या दाराला हॅंडल आहे. पण डावीकडे असलेल्या कपाटाच्या दाराला हॅंडलच नाहीये. हीच यातील चूक आहे.
वरच्या फोटोत चूक बघू शकता.