Optical illusion: भावांनो इज्जतीचा सवाल हाय! बिल भरायची वेळ आलीय अन् दोस्ताचं पाकिटच हरवलंय, शोधून देता का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 19:31 IST2022-10-28T19:30:16+5:302022-10-28T19:31:31+5:30
भावांनो कसंय की डेटवर गेलं की रुबाब झाडायचा एकही चान्स कुणी सोडतंय व्हय? मग ते भारी ड्रेसिंग असो किंवा मग बिल भरणं असो. पण नेमकं रेस्टॉरंटचं बिल भरण्याची वेळ आली आणि तुमचं पाकिटच तुम्हाला सापडेनासं झालं मग?

Optical illusion: भावांनो इज्जतीचा सवाल हाय! बिल भरायची वेळ आलीय अन् दोस्ताचं पाकिटच हरवलंय, शोधून देता का?
भावांनो कसंय की डेटवर गेलं की रुबाब झाडायचा एकही चान्स कुणी सोडतंय व्हय? मग ते भारी ड्रेसिंग असो किंवा मग बिल भरणं असो. पण नेमकं रेस्टॉरंटचं बिल भरण्याची वेळ आली आणि तुमचं पाकिटच तुम्हाला सापडेनासं झालं मग? झालं ना भर रेस्टॉरंटमध्ये तुमच्या रुबाबाचा एका क्षणात 'भाजीपाला'. बरं अशी वेळ कधीच कुणावर येऊ नये. आता याच प्रसंगाला अनुसरुन सध्या सोशल मीडियात एक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे.
रेस्टॉरंटचं बिल भरण्याची वेळ आलीय आणि तरुणीला डेटवर घेऊन आलेल्या तरुणाला त्याचं पाकिटच सापडत नाहीय असं हे एक चित्र कोडं आहे. चित्रातच त्याचं पाकिट दडलंय आणि तेच शोधून दाखवण्याचं आव्हान या कोड्यातून देण्यात आलं आहे. बरं तुम्ही चित्रात दडलेलं पाकिट शोधून आपल्या दोस्ताला मदत करालही पण खरं आव्हान असंय की ते पाकिट तुम्हाला अवघ्या १० सेकंदात शोधून दाखवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण तुम्हाला तर माहितंच आहे...दोस्ताच्या इज्जतीचा सवाल आहे! लगेच कामाला लागा...
तुमची तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजरेची परीक्षाच घेण्यासाठी हे चित्र कोडं बनवण्यात आलं आहे. पण हे सोडवताना बडे बडे तुर्रम खानही अपयशी होत आहेत. ९९ टक्के लोकांना पाकीट शोधण्यात अपयश आल्याचा दावा या चित्रासह करण्यात आला आहे. जर तुम्हाला पाकीट अजूनही सापडलं नसेल, तर याचं उत्तर खालील चित्रात सहज सापडेल.