गेस्ट रूममध्ये लोकांसोबत आहे एक भूत, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 14:58 IST2024-04-19T14:29:00+5:302024-04-19T14:58:07+5:30
Optical Illusion : एका रूममध्ये असलेल्या काही महिला आणि पुरूषांमध्ये एक भूत आहे. हाच भूत तुम्हाला शोधायचा आहे.

गेस्ट रूममध्ये लोकांसोबत आहे एक भूत, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज
Spot Hidden Vampire: सोशल मीडियावर एक गमतीदार फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला काही लोक दिसत आहे. पण याबाबत विचारण्यात आलेला प्रश्न बराच कन्फ्यूज करणारा आहे. बऱ्याच लोकांनी या फोटोतील प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातील काहीच लोकांना यश मिळालं.
एका रूममध्ये असलेल्या काही महिला आणि पुरूषांमध्ये एक भूत आहे. हाच भूत तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही जीनिअस असाल आणि या फोटोकडे बारकाईने बघाल तरच तुम्ही यातील भूत कुठे आहे हे शोधू शकाल.
जर तुम्हाला अजूनही उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. भूत या फोटोच्या उजव्या बाजूला आहे. आता तुम्ही जरा बारकाईने फोटो बघा आणि आपलं डोकं चालवा. कारण उत्तर काही तुम्हाला सहजासजही सापडणार नाहीये. भूत शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. जर अजूनही तुम्हाला यातील भूत दिसला नसेल तर निराश होऊ नका कारण खालच्या फोटोत उत्तर तुम्ही बघू शकता.
खालच्या फोटोत सर्कल केलेली व्यक्ती भूत आहे. कारण त्याच्या मागे असलेल्या आरशात त्याची सावली दिसत नाहीये. आणखी एक बाब म्हणजे त्याचे दात थोडे बाहेर आलेले म्हणजे कॅनाइन आहे.