8 संख्येच्या गर्दीत लपली आहे एक वेगळी संख्या, 10 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:09 IST2023-09-05T17:06:42+5:302023-09-05T17:09:11+5:30

Optical Illusion : तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला 8 ही संख्या दिसत आहे. पण या 8 संख्येमध्ये एक वेगळी संख्याही लपली आहे.

Optical illusion : Can you find hidden unique number between 8 number | 8 संख्येच्या गर्दीत लपली आहे एक वेगळी संख्या, 10 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!

8 संख्येच्या गर्दीत लपली आहे एक वेगळी संख्या, 10 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस!

Optical Illusion : सोशल मीडियावर लोक मनोरंजनासाठी वेगवेगळे ब्रेन टीजर्स शेअर करतात. ज्यांच्या माध्यमातून मेंदुला तर चालना मिळतेच सोबतच तुमच्या डोळ्यांचीही टेस्ट होते. असे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सॉल्व करायला आवडतात. 

ऑप्टिकल इल्यूजनच्या काही फोटोंमध्ये तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं नाही तर त्यातील चुका शोधायच्या असतात. ज्यासाठी तुम्हाला चांगलीच मेहनत घ्यावी लागते. याने मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला 8 ही संख्या दिसत आहे. पण या 8 संख्येमध्ये एक वेगळी संख्याही लपली आहे. जी तुम्हाला 10 सेकंदात शोधायची आहे. तुम्हाला वाटत असेल की, हे काम खूपच सोपं आहे. पण तसं नाहीये. ती वेगळी संख्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. 

fresherslive द्वारे शेअर करण्यात आलेल्या या फोटोत 8 संख्येसोबत तीन ही सुद्धा संख्या लिहिली आहे. जास्तीत जास्त लोकांना 10 सेकंदाचं हे चॅलेंज फारच अवघड वाटत आहे. काहींना यातील 3 ही संख्या दिसली. पण अनेकांना दिसली नाही. अजूनही तुम्हाला ही संख्या दिसली नसेल तर तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत यांचं उत्तर सर्कल केलं आहे.

Web Title: Optical illusion : Can you find hidden unique number between 8 number