Optical illusion : फोटोतील बेडूक शोधून भलेभले थकले, बघा तुम्हाला तरी दिसतो का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:13 IST2025-05-07T17:12:28+5:302025-05-07T17:13:10+5:30
Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडिया लोक भरभरून शेअर करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक बेडूक शोधायचा आहे.

Optical illusion : फोटोतील बेडूक शोधून भलेभले थकले, बघा तुम्हाला तरी दिसतो का...
Optical Illusion: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा ढीग लागला आहे. रोज वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे सॉल्व करायला किंवा त्यातील गोष्टी शोधायला लोकांना खूप आवडतात. कारण या फोटोंमधून मनोरंजन तर चांगलं होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. हेच कारण आहे की, ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडिया लोक भरभरून शेअर करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक बेडूक शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू, कधी काही जीव तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे ज्यात तुम्हाला 10 सेकंदात यातील बेडूक शोधायचा आहे. पण हे काम काही सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुमच्या समोरील फोटोत काही लोक पावसात छत्री घेऊन दिसत आहेत. तर रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. यातच बेडूक लपून आहे.
डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या या फोटोंची खासियतच असते की, यातील गोष्टी डोळ्यांसमोरच असूनही सहजपणे दिसून येत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे हवे असतात. बरेच लोक बराच वेळ शोधूनही त्यांना यातील गोष्टी दिसत नाहीत. तर काही लोकांना लगेच दिसून येतात.
तुम्हाला जर या फोटोत लपलेला बेडूक ठरलेल्या वेळेत तुम्हाला दिसला असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. थोडा आणखी वेळ घ्या. तरीही दिसला नाही तर तो आहे हे आम्ही तुम्हाला दाखवू. या फोटोत बेडूक कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.
फोटोतील बेडूक वरच्या फोटोत सर्कल केलेला तुम्ही बघू शकता.