या फोटोत लपला आहे एक जिराफ, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 09:25 IST2023-06-24T09:24:47+5:302023-06-24T09:25:07+5:30
Optical Illusion : लहान असो वा मोठे सगळयांना असे फोटो आवडतात. असाच एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक जिराफ शोधायचा आहे.

या फोटोत लपला आहे एक जिराफ, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : तसे तर ऑप्टिकल इल्यूजनचे सगळेच फोटो संभ्रमात टाकणारे असतात. पण त्यातील रहस्य शोधण्यात एक वेगळीच मजा येते. याने बुद्धीलाही चालना मिळते आणि डोळ्यांचीही टेस्ट होते. लहान असो वा मोठे सगळयांना असे फोटो आवडतात. असाच एक वेगळा फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक जिराफ शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांच्या विचाराला आव्हान देणारे असतात आणि लोकांच्या ऑब्जर्वेशन स्किलची टेस्टही घेतात. या फोटोंची खासियत ही असते की, काही वेळासाठी हे फोटो लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधतात आणि यामुळे मेंदुची चांगली करतही होते. या फोटोत तुम्हाला सूर्य, ढग आणि काही झाडे दिसत आहेत. ज्यात तुम्हाला जिराफ शोधायचा आहे.
या फोटोची खासियत म्हणजे या जिराफ सहजपणे दिसत नाही. इतका मोठा प्राणी असूनही त्याला शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. तसा फोटो फारच सुंदर आहे, पण त्यातील जिराफ शोधणं तेवढंच अवघड काम आहे. यातील जिराफ शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे.
कुठे आहे जिराफ?
यातील जिराफ एका झाडाजवळ उभा आहे आणि यात फक्त त्याची लांब मानच दिसत आहे. जिराफ सूर्याच्या बाजूला आणि एका झाडामागे लपला आहे. जिराफ फोटोत असा सेट करण्यात आला आहे की, बारकाईने बघितला तरी तो दिसणार नाही.