या फोटोत लपली आहे एक डॉल्फिन, बरेच फेल झाले; तुम्ही ट्राय करा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:00 IST2023-06-21T14:58:26+5:302023-06-21T15:00:06+5:30
Optical Illusion : हा एक असा फोटो आहे ज्यात बीच दिसत आहे आणि तिथे काही लोक सनबाथ घेत आहेत. यात काही लहान मुले खेळतानाही दिसत आहेत. काही महिलाही बसल्या आहेत.

या फोटोत लपली आहे एक डॉल्फिन, बरेच फेल झाले; तुम्ही ट्राय करा....
Find Dolphin in the Photo : ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील गुपित सॉल्व करणं सगळ्यांसाठीच मजेदार असतं. हे फोटो आपल्या मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम तयार करतात. पण तरीही यातील रहस्य शोधण्यात एक वेगळीच मजा येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक डॉल्फिन शोधायची आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं डोकं लावावं लागणार आहे.
हा एक असा फोटो आहे ज्यात बीच दिसत आहे आणि तिथे काही लोक सनबाथ घेत आहेत. यात काही लहान मुले खेळतानाही दिसत आहेत. काही महिलाही बसल्या आहेत आणि बीचवर एक डॉल्फिनही दिसत आहे. तुम्हाला हीच डॉल्फिन शोधायची आहे.
या फोटोची मजेदार बाब म्हणजे लोकांना यातील डॉल्फिन लगेच दिसत नाहीये. फोटोत दिसत आहे की, बरेच लोक चटईवर बसले आहेत आणि वरून छत्री लावली आहे. पण यात डॉल्फिन दिसत नाहीये. पण जर तुम्हाला ही डॉल्फिन दिसत नसेल, आणि अचानक तुम्ही ती शोधली तर तुम्ही जीनिअस आहात.
कुठंय डॉल्फिन?
या फोटोत डॉल्फिन एका चटईवर दिसत आहे. ही डॉल्फिन प्रत्यक्षात नाहीये तर तिचं चित्र आहे. फोटो बीचवर जी मुलगी डार्क ब्राउनचं शॉर्ट घालून चटईवर बसली आहे. त्याच चटईवर डॉल्फिनचं चित्र आहे. डॉल्फिनला फोटोसोबत असं सेट करण्यात आलं आहे की, जेणेकरून ती लवकर दिसू नये.