'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:33 IST2023-08-08T16:28:54+5:302023-08-08T16:33:21+5:30

Optical Illusion : सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या फोटोमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. हा फोटो बारकाईने बघा...काही दिसलं का? या फोटोत एक कुत्रा आहे.

Optical Illusion : Can you find doggy hidden in this photo | 'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील!

'या' फोटोत लपून बसलाय एक कुत्रा, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील!

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. या फोटोद्वारे लोकांना क्विज आणि गेम्स खेळण्याची संधी मिळते. यातून मनोरंजनही होतं आणि लोकांच्या बुद्धीची कसरतही होते. अशा काही फोटोंमध्ये एकतर काही शोधायचं  असतं नाही तर त्यातील चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक कुत्रा शोधायचा आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या फोटोमुळे चांगलेच हैराण झाले आहेत. हा फोटो बारकाईने बघा...काही दिसलं का? या फोटोत एक कुत्रा आहे. हा कुत्रा लोक शोधत आहेत. पण लोकांना काही तो सापडत नाहीये. कारण या फोटोतील कुत्रा फारच हुशारीने लपला आहे. तो आहे तुमच्या डोळ्यांसमोरच पण तुम्हाला दिसत नाहीये. पण तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला यातील कुत्रा नक्कीच सापडेल. पण त्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर चांगली आहे. तर हीच ती वेळ आहेत तुमच्या नजरेची परीक्षा घेण्याची. हा फोटो बघा आणि त्यातील कुत्रा शोधा. आता याने काय होणार असं विचाराल तर होणार काही नाही. पण तुमचा वेळ चांगला जाईल. जर अजूनही यातील कुत्रा तुम्हाला दिसला नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तो कुठे लपला आहे हे दिसेल.


 

 

Web Title: Optical Illusion : Can you find doggy hidden in this photo