या फोटोत लपली आहे बाळाची आई, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 14:09 IST2023-09-06T14:07:17+5:302023-09-06T14:09:51+5:30

Optical illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक लहान मुलगा दिसत आहे. पण यात त्याच्यासोबत त्याची आई सुद्धा आहे. जी तुम्हाला शोधायची आहे.

Optical illusion : Can you find baby's mother hidden in this photo | या फोटोत लपली आहे बाळाची आई, शोधाल तर ठराल जीनिअस!

या फोटोत लपली आहे बाळाची आई, शोधाल तर ठराल जीनिअस!

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे आपल्याला कन्फ्यूज करतात. या फोटोंमधील गोष्टी शोधणं सगळ्यांनाच आवडतं. कारण याने मनोरंजनासोबत मेंदुलाही चालना मिळते. यातील काही फोटोंमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये चुका शोधायच्या असतात. या फोटोंच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांची टेस्टही होते.

असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जो तुम्हाला नक्कीच हैराण करेल. तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक लहान मुलगा दिसत आहे. पण यात त्याच्यासोबत त्याची आई सुद्धा आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. या बाळाची आई शोधण्यासाठी तुमच्या केवळ 15 सेकंदाची वेळ आहे. 

तसं तर यातील बाळाची आई शोधणं काही सोपं काम नाही. त्यासाठी तुमच्याकडे चांगली नजर हवी सोबतच तुमचा मेंदुची शार्प हवा. तरच तुम्ही तिला शोधू शकाल. अनेकांनी प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. म्हणून या फोटोला हलक्यात घेऊ नका. 

जर ठरलेल्या वेळेत तुम्ही बाळाची आई शोधली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही तुम्हाला बाळाची आई सापडली नसेल तर निराश होऊ नका. तिला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. बाळाच्या आईला शोधण्यासाठी तुमच्या फोटो जरा तिरपा करावा लागेल. म्हणजे फोटोचा अॅंगल बदलून बघितलं तर तुम्हाला ती दिसेल. खालच्या फोटोत ते दिसू शकतं.

Web Title: Optical illusion : Can you find baby's mother hidden in this photo