Optical Illusion: फोटोतील कोंबडीच्या पिल्लाला शोधून दाखवा फक्त १० सेकंदात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:49 IST2022-11-21T13:48:34+5:302022-11-21T13:49:30+5:30

सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजन सोडवण्यात नेटिझन्स हुशार झाले आहेत. अनेक ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो व्हायरल होत आहेत. हे सोडवण्यात मजाही येते आणि डोक्याला थोडा ताणही देता येतो.

optical-illusion-can-you-find-baby-chicken-in-just-10-seconds | Optical Illusion: फोटोतील कोंबडीच्या पिल्लाला शोधून दाखवा फक्त १० सेकंदात !

Optical Illusion: फोटोतील कोंबडीच्या पिल्लाला शोधून दाखवा फक्त १० सेकंदात !

Optical Illusion : सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजन सोडवण्यात नेटिझन्स हुशार झाले आहेत. अनेक ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो व्हायरल होत आहेत. हे सोडवण्यात मजाही येते आणि डोक्याला थोडा ताणही देता येतो. तुमचे निरीक्षण किती आहे याची ही खरी परीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक जण दावा करतात की माझे निरीक्षण बेस्ट आहे मात्र ऑप्टिकल इल्युजन सोडवताना फेल होतात. आता हेच बघा या दिलेल्या फोटोमध्ये कोंबडीचे पिल्लू आहे. त्या पिल्लाला तुम्हाला फक्त १० सेकंदात शोधायचे आहे. 

सर्वात अवघड ऑप्टिकल इल्युजन

हे ऑप्टिकल इल्युजन सर्वात अवघड आहे असे म्हणतात. कारण केवळ १० सेकंदात त्या पिल्लाला शोधायचे आव्हान आहे. यामध्ये केवळ १ ते २ टक्के लोकांना यश आले आहे. या फोटोत गायीसोबत वासरु आहे, घोड्याची जोडी आहे, बदक आहे तसेच डॉग हाऊसबाहेर कुत्रा त्याच्या पिल्लासोबत बसला आहे. मात्र यात एक कोंबडी परेशान आहे कारण तिचे पिल्लू हरवले आहे.

काय मग दिसले का कोंबडीचे पिल्लू ?

फोटोतील डॉगहाऊसकडे नीट लक्ष देऊन बघा. कुत्रा आणि त्याचे पिल्लु तिथे आरामात बसलेले दिसते. कुत्र्याच्या बाजुलाच त्याला चिकटुन कोंबडीचे पिल्लु शांततेत बसले आहे. तुम्हाला लगेच पिल्लू का दिसले नसेल याचे कारण कुत्र्याचा आणि त्या पिल्लाचा रंग एकच आहे. त्यामुळे डोळ्यांना पटकन लक्षात येणे अवघड आहे. जर अजुनही पिल्लू दिसले नसेल तर खाली फोटो बघा.

optical Illusion

Web Title: optical-illusion-can-you-find-baby-chicken-in-just-10-seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.