तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:14 IST2023-12-02T13:14:19+5:302023-12-02T13:14:49+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला झाडी, कबूतर, मांजर, सॅंडा क्लॉज, 3 मुले आणि 3 मुलीसहीत इतरही बऱ्याच गोष्टी दिसत आहेत.

तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर 10 सेकंदात शोधून दाखवा या फोटोतील पोपट
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच लोकांचं डोकं चक्रावून सोडतात. काहींमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काहींमध्ये फरक शोधायचे असतात. पण हे काम काही सोपं नसतं. हे फोटो बघून सुस्त झालेला मेंदुही अॅक्टिव होतो. कारण हे फोटो बघून मेंदुची चांगली कसरत होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो आजकाल सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत असतात. कारण यातील गोष्टी शोधण्यात लोकांना मजा येते. सोबतच या फोटोतील पझल सॉल्व करता करता मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे फोटो आवडतात.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला झाडी, कबूतर, मांजर, सॅंडा क्लॉज, 3 मुले आणि 3 मुलीसहीत इतरही बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. या सगळ्यात तुम्हाला एक पोपट शोधायचा आहे. जो एका व्यक्तीच्या पिंजऱ्यातून उडाला आहे. या पोपटाला शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही 10 सेकंदात या फोटोतील पोपट शोधला असेल. जर असं असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला पोपट दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तो कुठे आहे ते बघू शकता.