झाडाच्या वाळलेल्या पानांमध्ये लपला आहे एक कुत्रा, तुम्हाला दिसतोय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:57 IST2023-08-09T17:52:42+5:302023-08-09T17:57:15+5:30
Optical Illusion : रोज सोशल मीडियावर असे संभ्रम निर्माण करणारे फोटो व्हायरल होत असतात. लहान असो वा मोठे सगळेच सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फॅन्स आहेत.

झाडाच्या वाळलेल्या पानांमध्ये लपला आहे एक कुत्रा, तुम्हाला दिसतोय का?
Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर रोज ऑप्टिकल इल्यूजन असलेले अनेक फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो असे असतात ज्यात लपलेल्या प्राण्यांना शोधायचं असतं. तर काही फोटोंमधील चुका शोधायच्या असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक कुत्रा आहे. पण हा कुत्रा शोधणं इतकंही सोपं नाही.
रोज सोशल मीडियावर असे संभ्रम निर्माण करणारे फोटो व्हायरल होत असतात. लहान असो वा मोठे सगळेच सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फॅन्स आहेत. लोकांना कोडी सोडवण्यात मजा येते. असंच काहीसं या फोटोतही आहे. या फोटोत कुत्रा लपला आहे. तुम्हाला या फोटोतील कुत्रा शोधायचा आहे. पण हा कुत्रा शोधून काढणं इतकंही सोपं नाहीये. त्यासाठी तुम्हाला फार बारकाईने फोटो बघावा लागेल.
फोटोत झाडांच्या पानांचा खच पडला आहे. याच पानांच्या खचात हा कुत्रा बसलेला आहे. पण तो सहज दिसणार नाही. तो तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण झाडांच्या पानांसारखाच कुत्र्याचा रंग असल्याने तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. तो फोटोच्या एका बाजूला आहे. तुम्हाला अजूनही तो दिसला नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.