फोटोत दिसत असलेल्या 7 च्या गर्दीत लपला आहे एक वेगळा नंबर, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:05 IST2025-05-24T15:22:51+5:302025-05-24T16:05:43+5:30
Optical Illusion : लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यातील गोष्टी एकमेकांना शोधण्याचं चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

फोटोत दिसत असलेल्या 7 च्या गर्दीत लपला आहे एक वेगळा नंबर, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. म्हणजे या फोटोतील गोष्टी समोरच असतात, पण त्या सहजपणे दिसत नाही. त्या शोधाव्या लागतात. लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यातील गोष्टी एकमेकांना शोधण्याचं चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
महत्वाची बाब म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये काही वस्तू, तर कधी लपवलेले प्राणी शोधायचे असतात तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक व काहींमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला 1 हा वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काही सोपं काम नाही. यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला खूपसारे 7 नंबर दिसत आहेत. पण यात केवळ 7 हाच आकडा नाहीये. यात एक वेगळा नंबर आहे तो म्हणजे 1. हा नंबर शोधण्याचं तुम्हाला आज चॅलेंज आहे. अशा फोटोंबाबत होतं असं की, एकसारख्या दिसणाऱ्या खूप गोष्टी एकत्र दिसल्या की, कन्फ्यूज व्हायला होतं. तेच इथे होतं. त्यामुळे हे काम जरा अवघड होतं. पण जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील वेगळा नंबर शोधू शकाल.
जर तुम्ही 10 सेकंदात या फोटोतील वेगळा शब्द म्हणजे 1 शोधला असेल तर तुमचं खूप अभिनंदन आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही सापडला नसेल तर निराश होऊ नका. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो कुठे आहे हे बघू शकता.
वरच्या फोटो तुम्ही फोटोतील वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.